Maharashtra Marathi News - ताज्या आणि ठळक मराठी बातम्या

वाद चिघळणार? महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येण्यास बंदी; कर्नाटक सरकारचा फतवा
Tv 9 | 1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm
Tv 9
1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm

बेंगळुरू: कर्नाटक आणि महाराष्ट्रा दरम्यान सीमावाद सुरू असतानाच कर्नाटक सरकारने एक फतवा काढला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील कोणत्याही मंत्र्यांना बेळगावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या या अजब फतव्यामुळे सीमावादाचा प्रश्न आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये असं पत्रं कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला पाठवलं आहे. कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना हे पत्रं पाठवलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.महाराष्ट्र सरकारने सीमावादावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. या समन्वय समितीत चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई आहेत. हे दोन्ही मंत्री डिसेंबर 6 डिसेंबर रोजी कर्नाटकात जाणार होते. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हे पत्रं पाठवलं आहे.दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आपण कर्नाटकात जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोणताही फॅक्स मिळाला नाही. मी 3 तारखेला जाणार होतो. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने कर्नाटकात कार्यक्रम असतात.त्यामुळे कर्नाटकातील लोकांनी विनंती केली की तुम्ही 6 डिसेंबरला यावं. 3 आणि 6 दोन्ही दिवशी जाणं शक्य होणार नाही. त्यामुळे मी 6 डिसेंबर रोजी कर्नाटकात जाणार आहे. तिथे आंबेडकरवाद्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.काय सोयी सुविधा देऊ शकतो. त्यासाठी मी जाणार आहे. त्यांच्यासाठी निर्णय घ्यायला जाणार आहे. आम्ही लोकांशी चर्चा करायला जाणार आहोत. चिथावणी द्यायला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वाद चिघळणार? महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येण्यास बंदी; कर्नाटक सरकारचा फतवा
राज्यात चर्चा एका पाटीची... कोण आहेत बंगल्याचे मालक? हिवाळी अधिवेशनाआधी विषय तापला
Tv 9 | 1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm
Tv 9
1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm

नागपूरः महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter session) येत्या 19 डिसेंबर रोजी नागपुरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर एका नव्याच गोष्टीची चर्चा सुरु आहे. ही चर्चा आहे एका पाटीची. स्थळ आहे. नागपूर विधानभवन परिसर. पाटीवर नाव आहे नरहरी झिरवळ, विधानसभा उपाध्यक्ष…. महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोडीनंतर शिंदे-भाजप सरकार आले. मात्र तत्कालीन सरकारमधील उपाध्यक्ष झिरवळ यांच्या नावाची पाटी बदललेली नाही.महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार उलथून दिल्यानंतर शिंदे-भाजप सरकार आलं. त्यानंतर मुंबईतल्या विधानभवनात नव्या सरकारचं पावसाळी अधिवेशनही झालं. आता येत्या 19 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन सुरु होईल. मागील पाच महिन्यात नागपूर विधानभवन परिसरातील पूर्वीच्या विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या पाट्याही बदलणं अपेक्षित होतं.हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 ने नागपुरातील तयारीचा आढावा घेतला. तेव्हा तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नावाची आणि पदाची पाटी तशीच ठेवल्याचे दिसून येत आहे. ही पाटी बदलण्याचे कुणाही अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे आले नाही, असा सवाल आता विचारला जातोय.सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत. 3 जुलै 2022 मध्ये त्यांची या पदावर निवड करण्यात आली. मात्र विधानसभा उपाध्यक्ष पद अद्यापही रिक्त आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष पद रिक्त होते. त्यांचा कारभार तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तत्कालीन सरकारवेळी लावण्यात आलेल्या या पाट्या आहेत. नागपुरच्या रविभवन परिसरातल्या या बंगल्यावरील पाट्या अजून बदललेल्या नाहीत. 

राज्यात चर्चा एका पाटीची... कोण आहेत बंगल्याचे मालक? हिवाळी अधिवेशनाआधी विषय तापला
मी माझा भाऊ यांच्या भेटीला आली, सुषमा अंधारे यांची शिंदे गटातील या नेत्यावर तिखट प्रतिक्रिया
Tv 9 | 1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm
Tv 9
1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm

भंडारा – मी माझा भाऊ नरेंद्र भोंडेकर यांच्या भेटीला आली, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी भोंडेकरांवर पलटवार करताना दिली आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी सुषमा अंधारे यांना भंडाऱ्यातून निवडणूक लढण्याचे आवाहन केले होते. त्यांच्यावर पलटवार करताना सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेबद्दल विचारले असता आम्ही सुद्धा आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी आलेलो आहोत. शिवसेना थकलेली नाही. नव्या उमेदीने लढणार हे दाखविण्यासाठी मी आलेली आहे, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. चार-दोन आमदार हलले म्हणजे शिवसेना संपली असे होत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.शिवसेनेचे मुख्य बेस हे त्यांचे वोटर आहेत. ते अजूनही शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले आहे. त्यांना नवीन ताकद आणि उमेद देण्याकरिता आल्याचे त्यांनी सांगितलं.सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना फुटणार, या मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. प्रकाश महाजनांनी पेढे वाटावे असा सल्ला त्यांनी महाजन यांना दिला आहे. महाजन कुटुंब पर्यायाने भाजप शिवसेना संपविण्यासाठी करत असलेले प्रयत्न त्यातून हे वाक्य असल्याचे ते बोलले.सुषमा अंधारेमुळे शिवसेना वाढणार आहे, याची भीती त्यांना असल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. मी जे बोलतोय ते परफेक्ट ठिकाणी जात असल्यामुळे माझ्यावर टीका होत आहे असेही त्या म्हणाल्या.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महिला मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय क्रांतीकारक असल्याचा वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले. त्या गोंदियात बोलत होत्या. मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहे, असे वक्तव्य करणे केवळ कंड्या पिकवण्याचे काम असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेत माझ्यापेक्षाही ज्येष्ठ नेत्या असल्याचे त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

मी माझा भाऊ यांच्या भेटीला आली, सुषमा अंधारे यांची शिंदे गटातील या नेत्यावर तिखट प्रतिक्रिया
संजय राऊत यांना पिसाळलेला कुत्रा चावलाय, शिंदे गटाच्या कोणत्या आमदाराने केली जहरी टीका
Tv 9 | 1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm
Tv 9
1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm

मुंबई : संजय राऊतला पिसाळलेलं कुत्र चावलेलं आहे, स्वतःच घरं सांभाळ ना ? अकलेचे तारे कशाला तोडायला लागला ? हाच माणूस राज्यसभेच्या वेळेला आमच्या पाया पडत होता. आम्ही मतदान केलेलं, म्हणून निवडून येतो, दरवेळेला मतदान करतो आणि हा आम्हाला सांगणार काय ? हा काय आमच्या मतदार संघात येतो का ? याच्या जिवावर थोडीच आमची निवडणूक चालते असे विविध सवाल उपस्थित करत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर नेहमीच जहरी टीका केली आहे.दरम्यान, संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी शिंदे गटाने राजकीय कबर खोदली आहे. ते प्यारे झाले म्हणत सडकून टीका केली होती.शिवसेना नावावर निवडून येतात, आता शिवसेनेचे नाव न घेता निवडून येऊन दाखवा असंही संजय राऊत यांनी आव्हान केले होते.मी खात्रीने सांगतो, माझा शब्द आहे. ज्या भागातील जे खासदार आणि आमदार निवडून गेले त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं. खासदार गोडसे यांचं तर राजकीय करीयरच संपलं आहे.आम्हीच ती जागा लढवली होती. जे आमदार गेले. नांदगावपासून मालेगावपर्यंत त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं ना. हा आत्मविश्वास कुठून येतो. आम्ही फिरतो. लोकांमध्ये बसतो. त्यातून त्यांची चीड दिसत आहे. त्यावरून आत्मविश्वास येतो.सर्व जागेवर आहे. काही पालापाचोळा उडून गेला असेल. तो उडतच असतो. आज या गटात उद्या त्या गटात. हे काही नवीन नाहीये. शिवसेना आहे तशीच आहे असं संजय राऊत यांनी नाशिकमध्ये म्हंटलं होतं.त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठी यांनी जोरदार हल्लाबोल करत स्वतःच आमच्या जिवावर निवडून येतो आणि तो काय सांगणार असं मनात शिरसाठ यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत यांना पिसाळलेला कुत्रा चावलाय, शिंदे गटाच्या कोणत्या आमदाराने केली जहरी टीका
PAK vs ENG: स्टोक्सने पहिल्या बॉलवर Naseem Shah ला मारला सिक्स, नंतर असा घेतला बदला, VIDEO
Tv 9 | 1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm
Tv 9
1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm

रावळपिंडी: पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या इंग्लंडने पाकिस्तानी गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. पहिली टेस्ट कसोटी कमी आणि टी 20 सामना जास्त वाटतोय. कारण इंग्लंडच्या बॅट्समननी बॅटिंगची तशी केली. आज दुसऱ्यादिवसाची सुरुवात देखील तशीच झाली होती. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहला पहिल्याच चेंडूवर सिक्स मारला. काल पहिल्या दिवशीच इंग्लंडच्या टीमने चार बाद 506 धावा केल्या होत्या. 145 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात जे घडलं नाही, ते काल इंग्लंडच्या टीमने करुन दाखवलं.त्याच ओव्हरमध्ये कमबॅकआज पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात षटकाराने झाली. स्टोक्सने नसीम शाहला सिक्स मारला. पण पाकिस्तानच्या या प्रतिभावान गोलंदाजाने त्याचा ओव्हरमध्ये कमबॅकही केलं. सिक्स मारल्यानंतर दुसऱ्या बॉलवर स्टोक्सने एकेरी धाव घेतली. पण त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हॅरी ब्रूकने सिंगल धाव काढली. पुन्हा स्टोक्स स्ट्राइकवर आला.स्लोअरवनचा उपयोगस्टोक्स पुन्हा हल्लाबोल करणार, हे नसीम शाहला ठाऊक होतं. बेन स्टोक्स T20 क्रिकेटच्या मूडमध्ये होता. स्टोक्सने गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. पण नसीमने चेंडूला जास्त वेग दिला नाही. त्याने स्लोअरवन टाकला. स्टोक्सने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूने थेट स्टम्पसचा वेध घेतला.First over of the day and @iNaseemShah dismisses the England captain 👏#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/TYsrV8oG6p— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 2, 2022नसीम शाहच्या 3 विकेट18 चेंडूत 41 धावांवर बाद होऊन स्टोक्सने पॅव्हेलियनची वाट पकडली. त्याने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. नसीम शाहने त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि हॅरी ब्रूकचा विकेट काढला. त्याने 24 ओव्हर्समध्ये 140 धावा देऊन 3 विकेट काढल्या.

PAK vs ENG: स्टोक्सने पहिल्या बॉलवर Naseem Shah ला मारला सिक्स, नंतर असा घेतला बदला, VIDEO
'श्री औरत चालिसा' शाळेतल्या मुलांचा व्हिडीओ, शिक्षकांवर टीका, संमिश्र प्रतिक्रिया!
Tv 9 | 1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm
Tv 9
1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm

शाळा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित व्हिडिओही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सर किंवा मॅडमच्या शिकवण्याच्या पद्धती लोकांना आश्चर्यचकित करतात. तसे पाहिले तर प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते. विशेष म्हणजे मुलांनाही अशाच प्रकारे अभ्यासाचा आनंद मिळतो. तसं पाहिलं तर मुलं शाळांमध्ये अभ्यासाशी संबंधित अनेक गोष्टी शिकतात. हल्ली सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहून आणि ऐकल्यानंतर तुम्ही खूप हसाल.या व्हिडीओमध्ये दोन मुलं शाळेतच महिला शिक्षकांसमोर ‘श्री औरत चालिसा’  म्हणताना दिसतायत. हनुमान चालीसा किंवा दुर्गा चालिसा तुम्ही ऐकल्या असतील, पण क्वचितच ‘औरत चालिसा’ ऐकल्या असतील.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मुलं वर्गात उभी राहून महिला शिक्षकांसमोर ‘औरत चालिसा’ पठण करत आहेत. मुलांची ही चालिसा ऐकल्यानंतर मॅडमही खूप हसताना दिसतात.या औरत चालिसा मध्ये या मुलांनी महिलांचं वर्णन केलंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोमाने व्हायरल होतोय. हा ‘औरत चालिसा’ व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @KhadedaHobe नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सुनियेगा पेश है ‘श्री औरत चालिसा’.सुनियेगा पेश है ‘श्री औरत चालीसा’…😂https://t.co/8oG8nr0luK pic.twitter.com/RrbaJxfs6M— Prakash Raj (Parody) (@KhadedaHobe) November 29, 2022अवघ्या एका मिनिटाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 9 हजारहून अधिक लोकांनीही या व्हिडिओला लाईक केले आहे.त्याचबरोबर व्हिडिओ पाहून लोकांनी विविध प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मात्र काही लोक या व्हिडिओवर टीकाही करत आहेत.

'श्री औरत चालिसा' शाळेतल्या मुलांचा व्हिडीओ, शिक्षकांवर टीका, संमिश्र प्रतिक्रिया!
संभाजी महाराजांची बदनामी करण्याची सुपारी नाटककार, चित्रपटकारांनी घेतली, इतिहासकारांनी संदर्भासह स्पष्टीकरण केलं...
Tv 9 | 1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm
Tv 9
1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm

कोल्हापूरः मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले. आणि त्यामुळे आता त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य वरून राज्यात पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे आहे.मात्र काही दिवसांपूर्वी मी गजानन मेंहदळे यांना त्याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले की, इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात ते सात होते की आठ होते याचा उल्लेख नाही.इतिहासातील कोणत्याही पानावर प्रतापरव गुजरांबरोबर कोण लोक होते याचा उल्लेख आलेला नाही, आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सगळी काल्पनिक आहेत असं वक्तव्य त्यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारणासह अनेक इतिहास अभ्यासक आणि संशोधकांनी यावर आक्षेप घेतले.राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर कोल्हापूरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी याविषयी बोलताना सांगितले की, प्रतापराव गुजर आणि बेहलोल खानामध्ये दोन मोठी युद्ध झाली होती.उमराणीच्या युद्धात प्रतापरावांनी बेहलोल खानाला धर्मवाट दिली असल्याचा इतिहास इंद्रजित सावंत यांनीच सांगितला. प्रतापराव गुजर आणि बेहलोल खान यांच्यातील झालेला बहलोल खाना आणि प्रतापरावांबरोबर झालेला तह त्यांनी मोडला होता असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी याविषयी बोलताना आणि इतिहासाचे दाखले देताना सांगितले की, इतिहासाचा अभ्यास कुठल्या एका साधनांवर होत नाही.तर अनेक साधनं जमा करून त्यातून अन्वयार्थ काढावा लागतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे इतिहासातील पुराव्याच्या आधारावरच नेसरीच्या युद्धाचे पुरावे इतिहासात 100 टक्के असल्याचा दावा इंद्रजित सावंत यांनी केला आहे.इतिहासातील इंग्रजांच्या दुभाष नारायण सिनवी यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, नारायण सिनवी हे इंग्रजांचे दुभाष होते.त्यांनीही प्रतापराव आणि त्यांच्या सोबतच्या सहा सरदाराचा उल्लेख इतिहासात केला आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.त्यामुळे इतिहासामध्ये प्रतापराव गुजर यांच्याबाबतचा इतिहासात काही उल्लेख सापडत नाही असं म्हणत असतील तर नंतरही कोणी हे युद्ध झालं नाही असं म्हणत असेल तर हे चुकीचं आहे असं स्पष्ट मतही त्यांनी यावेली व्यक्त केले.यावेळी इंद्रजित सावंत यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी चाललेल्या राजकारणाविषयी आणि त्यांच्या इतिहासाविषयीही आपली भूमिका मांडली.यावेळी इंद्रजित सावंत यांनी सांगितले की औरंगजेबाला शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची रणनीती समजली होती. संभाजीराजे मोगलाईत फितुरी करण्यासाठी गेले होते. तसं नसतं तर शिवाजी महाराजांसारखा कर्तव्यात कठोर असणाऱ्या राजानं संभाजीराजांना त्यांनी माफ केलच नसतं.यावेळी त्यांनी संभाजीराजे यांच्याविषयी माहिती देताना म्हणाले की, शंभूराजे हे संस्कृतचे तज्ज्ञ होते. त्याचबरोबर अण्णाजी दत्तो आणि त्याच्या गटातील लोक संभाजी राजेंचा द्वेष करत होते.छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी राजांचा हक्क यांनीच डावलला होता.त्याचमुळे ही मंडळी संभाजीराजांच्या जीवावर उठली होती असं सांगत त्यांनी इतिहासातील एक बाजू सांगितली.ब्रह्मतेच्या पातकाला प्रायचीत्त नव्हतं. त्यामुळे संभाजीराजे ब्राह्मणाला हत्तीच्या पायी देतात याची सल त्यांना कायम होती.ही सल आजही वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर काढली जात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.त्यावेळेपासून संभाजी राजेंच्या बदनामीची केंद्र महाराष्ट्रात फिरत आहे. त्यामुळेच सगळे नाटककार चित्रपटकारांनी संभाजी महाराजांची बदनामी करण्याचे सुपारी घेऊनच हे काम केलं असल्याची टीका त्यांनी नाटककार आणि चित्रपटकारांवर केली आहे. यामुळेच पराक्रमी संभाजीराजेंचे चरित्र बदनामीच्या गर्तेत सापडलं होते असंही त्यांनी म्हटले आहे.तर ‘हर हर महादेव’ चित्रपटाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, बाजीप्रभू देशपांडे हे बादलांचे सरनोबत होते. आणि बांदल हे शिवाजी महाराजांचे नातेवाईक होते.जर बांधलचं शिवाजी महाराजांच्या बरोबर पहिल्यापासून असतील तर त्यांचा सेवक असलेले बाजीप्रभू शिवाजी महाराजांच्या विरोधात कसे जातील असा सवालह त्यांनी उपस्थित केला आहे.तसेच इतिहासात अशा लढाईचा कोणताही उल्लेख नाही. यांच्या तलवारी एकमेकाला भिडल्या आहेत असा किंचितही पुरावा इतिहासात नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संभाजी महाराजांची बदनामी करण्याची सुपारी नाटककार, चित्रपटकारांनी घेतली, इतिहासकारांनी संदर्भासह स्पष्टीकरण केलं...
जर माझे लग्न झाले नसते तर...म्हणत गोविंदाने माधुरी दीक्षित हिच्याबद्दल केले होते हे मोठे वक्तव्य
Tv 9 | 1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm
Tv 9
1 hour ago | 02-12-2022 | 05:05 pm

मुंबई : गोविंदाने आपल्या अभिनयाच्या काैशल्याने लोकांच्या मनात एक वेगळे स्थान मिळवले आहे. गोविंदा कायमच चर्चेत असतो. गोविंदाने आतापर्यंतच्या बाॅलिवूड करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 90 च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा ठरला आहे. विशेष बाब म्हणजे आजही गोविंदाची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. नुकताच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात गोविंदाच्या पाया पडून एका पाकिस्तानी अभिनेत्याने सांगितले की, मी गोविंदा सरांकडे पाहून अभिनय करायला शिकलोय.गोविंदाचे फॅन फक्त भारतामध्येच नाही तर जगभरात बघायला मिळतात. अभिनेता गोविंदा गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, अनेक शोमध्ये गोविंदा हजेरी लावतो.एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये नुकताच गोविंदा आणि त्याची पत्नी पोहचले होते. याच कार्यक्रमात गोविंदाच्या मुलाने त्याच्यासोबत एका हीट गाण्यावर जबरदस्त डान्स केला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता.काही वर्षांपूर्वी गोविंदाने एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने काही अभिनेत्रींबद्दल बोलत असताना माधुरी दीक्षित हिच्याबद्दल असे काही बोलले होते की, यामुळे तो प्रचंड चर्चेत आला होता.गोविंदा म्हणाला की, माधुरी दीक्षित मला खूप जास्त आवडते. खरोखर सांगतो की, जर माझे लग्न झाले नसते तर मी नक्कीच तिकडे बघितले असते. इतकी सुंदर अभिनेत्री सध्या बघायला तरी कुठे मिळते?माधुरी दीक्षित आणि गोविंदा यांनी दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. रवीना टंडन, करिश्मा, जूही चावला या देखील माझ्या आवडत्या अभिनेत्री असल्याचे गोविंदाने म्हटले होते.याच मुलाखतीमध्ये गोविंदाने सांगितले होते की, पहिल्या पगारीमध्ये त्याने त्याच्या आईसाठी एक साडी आणि चैन खरेदी केली होती. गोविंदाचा मुलगा लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.

जर माझे लग्न झाले नसते तर...म्हणत गोविंदाने माधुरी दीक्षित हिच्याबद्दल केले होते हे मोठे वक्तव्य