Ajit Pawar In Pune: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आता काहीच उरलं नाही; अजित पवारांचा हल्लाबोल

Abp News | 1 week ago | 06-08-2022 | 11:55 am

Ajit Pawar In Pune: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आता काहीच उरलं नाही; अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar In Pune: महाराष्ट्रातील सरकार दिल्लीहून चालत आहे. त्यामुळे दिल्लीतील आदेशाशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणताच निर्णय घेऊ शकत नाही आहे. या दोघांच्या हातात आता काहीच उरलं नाही आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.  पुण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यलयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.रोज माध्यामाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची विचारणा केली जात आहे. मात्र त्यांच्याकडून लवकरच होईल, असं उत्तर गेले अनेक दिवस आपण ऐकतो आहे. यांच्या या कारभारामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे. आमचं सरकार असताना आम्ही असा पेच निर्माण होऊ दिला नव्हता, असंही ते म्हणाले.महापालिकेची तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्यात आली आणि चार सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभाग रचना बदलण्याची जी पावलं या नव्या सरकारने उचलली आहेत, त्यानुसार पुढच्या फेब्रुवारीच्या आसपास निवडणुका होतील, असं बोललं जातंय. मात्र कोणी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने आधीच्या प्रक्रियेनुसार निवडणूका घ्यायला लावल्या, तर कधी ही निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे निवडणुकीसाठी सज्ज रहा, अशाही सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.सरकार किती दिवस चालेल सांगता येत नाहीसत्तेत असताना मंत्री आणि आमदार प्रशासन अधिकाऱ्यांशी कसे वागले, याची फळं सत्तेतून बाहेर पडल्यावर मिळतात. कारण ते प्रशासकीय अधिकारी विरोधात असणाऱ्या नेत्यांना धडा शिकवतात. तेंव्हा कोणीच तांबरपट घेऊन जन्माला आलेलं नाही. त्यामुळं हे सरकार सुद्धा किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बरंच काही अवलंबून आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यलयाचे उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना अनेक सूचना केल्या. नुसतं कार्यालय खोलून चालणार नाही. तर त्या कार्यालयात तुम्ही सकाळपासून जनतेसाठी उपलब्ध असायला हवं. सध्या राज्यात काय घडलं, कोणामुळं घडलं, पुढं काय घडणार? हे सर्व जण पाहत आहात. त्यामुळे नीट काम करा, असंही त्यांनी सांगितलं. 

Google Follow Image