Akola news : एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीसह तीन तरुण बेपत्ता

Abp News | 4 days ago | 06-08-2022 | 05:25 pm

Akola news : एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीसह तीन तरुण बेपत्ता

अकोला : एकाच महाविद्यालयाध्ये शिकणारे तीन तरुण आणि एक तरुणी मागील पाच दिवसांपासून बेपत्ता (Akola Missing Case) आहे.  एक ऑगस्टपासून हे तिघे बेपत्ता आहे. 1 ऑगस्टला चौघेही घरून कॉलेजला गेले मात्र तेव्हापासून ते परतलेच नाहीत. चौघेही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या व्याळा येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकत आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील तिघांचा तर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील तरुणाचा देखील समावेश आहे.तुळशी अनिल ताले (वय 18 , राहणार रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला), प्रतीक मनोहर तायडे (वय 21 रा.अडगाव बु. ता.तेल्हारा, जि. अकोला), हर्ष विष्णू घाटोळ (वय 17 वर्ष 11 महिने, पळशी खुर्द ता.खामगाव, जि.बुलढाणा) आणि प्रफुल पांडुरंग लंगोटे (वय 19, राहणार न्यू भीम नगर, कृषी नगर, अकोला) हे चौघे बेपत्ता असल्याची तक्रार बाळापूर आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल आहे.बेपत्ता झालेले चौघेही बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील मानव सिटी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. सोमवारी घरातून ते कॉलेजमध्ये गेले होते, मात्र अद्याप अद्याप घरी परतलेच नाही. हे चौघेही कुठे दिसून आल्यास तात्काळ अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांना संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 7020821785 आणि  9850528885  या मोबाईल क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.संबंधित बातम्या :Mumbai Police : मुंबई पोलिसांचं 'मुस्कान'! एका महिन्यात हरवलेल्या पावणेदोनशे बालकांना शोधलंPune Crime News: अन् सोशल मीडियामुळे घरातून निघून गेलेली मुलगी तीन महिन्यांनी सापडली

Google Follow Image