Amravati Murder Case: उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर आरोपींची 'बिर्याणी पार्टी' , एनआयएचा दावा

Abp News | 4 days ago | 06-08-2022 | 12:11 pm

Amravati Murder Case: उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर आरोपींची 'बिर्याणी पार्टी' , एनआयएचा दावा

मुंबई: या प्रकरणात एनआयएने आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टासमोर हजर करण्यात आले. दोन्ही आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कस्टडी मध्ये पाठविण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. या दोन्ही आरोपींवर कोल्हे हत्याकांडामध्ये सामील इतर आरोपींची मदत करणे आणि हत्येनंतर 'बिर्याणी पार्टी'चा आयोजन केल्याचा गंभीर आरोप एनआयएमार्फत कोर्टात करण्यात आला आहे. यापूर्वी सदर प्रकरणात एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण 9 आरोपींना उमेश कोल्हे हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.अमरावतीतील उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात एनआयएने बुधवारी आणखी दोन आरोपींना अटक केले. मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टासमोर हजर करण्यात आले. दोन्ही आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कस्टडी मध्ये पाठविण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. या दोन्ही आरोपींवर कोल्हे हत्याकांडामध्ये सामील इतर आरोपींची मदत करणे आणि हत्येनंतर 'बिर्याणी पार्टी'चा आयोजन केल्याचा गंभीर आरोप एनआयएमार्फत कोर्टात करण्यात आला आहे. यापूर्वी सदर प्रकरणात एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण 9 आरोपींना उमेश कोल्हे हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.मात्र ही पार्टी कुठे झाली त्यात कोण कोण सहभागी होतं याबाबत एनआयए आरोपींची चौकशी करायची आहे. यासाठी यासाठी आरोपींची रिमांड मागण्यात आली. चौकशीअंती सर्व बाबी उघड होतील. मुशफीक अहमद हा मौलवी आहे, तर अब्दुल अरबाज हा एका एनजीओमध्ये ॲम्बुलन्सचा ड्रायव्हर आहे. आज दोघांना एनआयए कोर्टात रिमांडसाठी हजर केले होते. यावेळी या दोन्ही आरोपींनी उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाइंड इरफान खान आणि इतर आरोपींना कोल्हेची हत्या झाल्यानंतर लपवण्यास मदत केली होती.

Google Follow Image

Latest NewsMAHARASHTRA WEATHERMAHARASHTRA WEATHER