Ashadhi Wari : पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल; दिवे आणि बोपदेव घाट तीन दिवस बंद

Abp News | 4 days ago | 23-06-2022 | 04:30 pm

Ashadhi Wari : पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल; दिवे आणि बोपदेव घाट तीन दिवस बंद

पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज (Sant Dyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालख्या  सध्या पुण्यात मुक्कामी आहेत. या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी 24 ते 28 जून या कालावधीत तर  संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी 24 जून ते 5 जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व  प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे,संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतूक बदल :संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतूक मार्ग 

Google Follow Image