औरंगजेब बादशहा वाईट राजा नव्हता, त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय : अबू आझमी

Abp News | 4 days ago | 06-08-2022 | 05:17 pm

औरंगजेब बादशहा वाईट राजा नव्हता, त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय : अबू आझमी

मुंबई : "औरंगजेब यांचा खरा इतिहास दाखवला तर हिंदू नाराज होणार नाहीत. अनेक लोकांची नावे औरंगजेब आहेत. औरंगाबादमध्ये देखील अनेकांची औरंगजेब अशी नावे आहेत. 36 जिल्ह्यांत तीन नावे उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद अशी मुस्लिम आहेत. औरंगजेब बादशहा वाईट राजा नव्हते, त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय," असे मत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी व्यक्क केले आहे. अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाप्रमाणे कर्जतमध्ये एका तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रकरणाचा छडा लावत आरोपींना शिक्षा देण्यात येईल असं म्हटलं आहे. याबरोबरच हिंदूंवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असे देखील त्यांनी म्हटले. यावर बोलताना अबू आझमी यांनी देशात मुस्लिम बांधवांवर देखील हल्ले होत असल्याचे म्हटले आहे. हिंदूंवर हल्ला होत आहे, तर मुस्लिम बांधवांवर देखील हल्ले होत आहेत. धर्माच्या नावावर, मंदिर-मस्जिद यावर भाडकवण्याचे काम नारायण राणे यांचे पुत्र करत आहेत. श्रीलंकेप्रमाणे देशाची स्थिती होऊ नये. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. पण त्यावर बोलण्या ऐवजी राणे हे हिंदुत्वाचे राजकारण करत आहेत, अशी टीका अबू आझमी यांनी केली. अबू आझमी म्हणाले, औरंगजेब बादशहा वाईट राजा नव्हते. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेब यांचा खरा इतिहास दाखवला तर हिंदू नाराज होणार नाहीत. अनेक लोकांची नावे औरंगजेब आहेत. औरंगाबादमध्ये देखील औरंगजेब अशी नावे आहेत. 36 जिल्ह्यांत तीन नावे उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद अशी मुस्लिम आहेत. या तीन जिल्ह्यांची नावे बदलल्याने कोणाला नोकरी मिळणार नाही, महागाई कमी होत नाही. जिल्ह्यांची नावे बदलून तरुणांना नोकरी मिळत असेल तर नाव बदलल्याचे स्वागत करेन."महत्वाच्या बातम्या

Google Follow Image

Latest NewsMAHARASHTRA WEATHERMAHARASHTRA WEATHER