Bigg Boss 16 | 'सुंबुल ताैकीर'च्या गेममध्ये सुधारणा करण्यासाठी बिग बाॅसने खेळला मोठा गेम

Tv 9 | 1 week ago | 25-11-2022 | 03:05 am

Bigg Boss 16 | 'सुंबुल ताैकीर'च्या गेममध्ये सुधारणा करण्यासाठी बिग बाॅसने खेळला मोठा गेम

मुंबई : बिग बॉस 16 मध्ये मोठा हंगामा होताना दिसत आहे. बिग बाॅसच्या घराबाहेर देखील एक नवे बिग बाॅस खेळणे सुरू आहे. याला सुरूवात सुंबुल ताैकीर खानच्या वडिलांनी केली. यानंतर मग काय शालिन भनोट आणि टीना दत्ताच्या आईने देखील जोरदार उत्तर दिले. तब्येत खराब असल्याचे कारण देत सुंबुलच्या वडिलांनी बिग बाॅसला सुंबुलला काॅल करण्यास सांगितले. विशेष म्हणजे ही विनंती बिग बाॅसने देखील मान्य केली. सुंबुलच्या वडिलांनी यावेळी सुंबुलसोबत काॅलवर बोलताना शालिन आणि टीनावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. इतकेच नाही तर बाहेर काय सुरू आहे हे ही सुंबुलच्या वडिलांनी सांगितले आहे.मुळात म्हणजे बिग बाॅसच्या घरात एकदा दाखल झाल्यानंतर बाहेर काय सुरू आहे, हे घरातील सदस्यांना अजिबात सांगितले जात नाही. मात्र, हे असूनही सुंबुलच्या वडिलांनी बाहेरील गोष्टी सुंबुलला सांगितल्या.हे सर्व संभाषण टीव्हीवर दाखवण्यात आले. यामध्ये सुंबुलच्या वडिलांनी शालिन आणि टीनावर टिका केली होती. हे पाहून शालिनच्या वडिलांचा आणि टीनाच्या आईचा चांगलाच पारा चढला. मग काय त्यांनीही टीका केली.सुंबुल बाहेर अत्यंत खराब दिसत असल्याचे यापूर्वी सलमान खान याने सुंबुलला 100 वेळा सांगितले आहे. इतकेच नाही तर तिच्या वडिलांना देखील बिग बाॅसच्या मंचावर आणले होते, सुंबुलला समजवण्यासाठी.सुंबुलचा गेम सुधारण्यासाठी इतके जास्त प्रयत्न बिग बाॅसकडून केले जात असताना सुंबुलचा गेम अजिबातच सुधारला नाहीये. इतक्या लोकांनी तिला समजावूनही तिने तिच्या गेममध्ये काहीच सुधारणा केली नाहीये.अजूनही सुंबुल बिग बाॅसच्या घरात शालिनच्या मागे फिरत आहे. शेवटी सुंबुलचा गेम सुधारण्यासाठी आता बिग बाॅसनेच मोठा गेम केला आहे. सुंबुलचा खास मित्र फहमान खान याला शोमध्ये पाठवले आहे.सुंबुलचा गेम सुधारण्यासाठी बिग बाॅस ज्याप्रकारे मेहनत घेत आहे, हे पाहून अनेकांनी टीका केली आहे. इतकेच वाटत असेल तर हिला बिग बाॅस 16 ची ट्रॉफी द्या, असेही अनेकांनी म्हटले आहे.

Google Follow Image