Chenab Bridge : चिनाब रेल्वे ब्रिज पूर्णत्वाच्या दिशेने, ठरणार जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे ब्रिज

Abp News | 6 days ago | 05-08-2022 | 05:56 pm

Chenab Bridge : चिनाब रेल्वे ब्रिज पूर्णत्वाच्या दिशेने, ठरणार जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे ब्रिज

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या इतिहासात एक सुवर्ण पर्व लिहिलं जाणार असून जम्मू आणि काश्मीरमधील जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज हा भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. या महिन्यात ब्रिजचे अभियांत्रिकी काम पूर्णत्वाच्या दिशेने जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर तो ब्रिज पॅरिस मधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच असेल.जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कौरी गावाजवळ सलाल धरणाच्या वरच्या बाजूला या ब्रिजचे काम सुरु आहे. चिनाब नदीपात्रापासून 359 मीटर उंची वरील ब्रिजचे ओव्हरआर्च डेक लॉन्चिंग गोल्डन जॉइंटसह पूर्ण होईल. गेल्या वर्षी जगातील सर्वात उंच अशा या रेल्वे ब्रिजच्या स्टील आर्चचे काम पूर्ण  झाले. हा ब्रिज जम्मू उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीर मधील दुर्गम भाग देशाच्या इतर भागाशी जोडले जातील.  1315 मीटर लांबीच्या चेनाब रेल्वे ब्रीजच्या बांधकामात सुमारे 30,350 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तर आर्चच्या बांधकामात 10,620 MT स्टीलचा वापर झाला आहे आणि 14,504 MT स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला आहे.उत्तर रेल्वे (NR) आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) यांची चिनाब ब्रीजच्या डिझाइनला अंतिम रूप देण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यावेळी आलेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेची मदत झाली. तसेच मेथड स्टेटमेंट आणि रेखाचित्रांसाठी मान्यता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या दोघांनी स्थानिक रोजगार निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व रस्ते बांधले. या रस्त्यांमुळे या भागातील दूरवरच्या गावांना जोडणी मिळाली आहे.उत्तर रेल्वेने या पूलाच्या वेल्ड्सच्या तपासणीसाठी फेज्ड अॅरे अल्ट्रासोनिक टेस्टिंग मशीन (Phased Array Untrasonic Testing Machine) वापरण्याची परवानगी दिली. भारतात प्रथमच असे करण्यात आले आहे.  

Google Follow Image