Chhagan Bhujbal : कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा 29 टक्के वाटा, तरीही कांदा दरात घसरण : छगन भुजबळ

Abp News | 1 week ago | 05-08-2022 | 05:41 pm

Chhagan Bhujbal : कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा 29 टक्के वाटा, तरीही कांदा दरात घसरण : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : कांद्याच्या दरात (Onion Rate) सातत्याने घसरण होत असून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Farmers) अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांदा बाजार भावातील घसरण थांबविण्यासाठी राज्यशासनाकडून (State Goverment) उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील नाशिक, पुणे, सोलापुर, सातारा, अहमदनगर, धुळे, बुलढाणा आणि जळगांव इ. जिल्हे कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असुन महाराष्ट्रातील एकुण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा 29 टक्के वाटा आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कांदा ह्या शेतीमालाच्या खरेदी - विक्रीसाठी माझ्या मतदारसंघातील लासलगांव बाजार समिती ही आशिया खंडात प्रसिध्द अशी बाजारपेठ आहे. येथे विक्रीस येणाऱ्या एकुण आवकेपैकी 85 ते 90 टक्के आवक ही कांदा ह्या शेतीमालाची असते. सर्वसाधारणपणे हा कांदा नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार व औरंगाबाद या सहा जिल्ह्यातून विक्रीस येतो. आलेल्या कांदा आवकेपैकी 70 ते 80 टक्के कांदा हा निर्यातयोग्य असतो. नाशिक जिल्ह्यातील लासलगांवसह इतर सर्व बाजार समित्या या प्रायमरी मार्केट असल्याने येथे फक्त शेतकरी बांधवांचाच शेतीमाल विक्रीस येत असल्याचे म्हटले आहे.  सद्यस्थितीत रब्बी (उन्हाळ) कांद्याची विक्री सर्वसाधारण सरासरी 800 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे होत आहे. गेल्या 15 दिवसातील कांदा बाजारभावाचा विचार करता बाजारभाव स्थिर असल्याने सध्या मिळत असलेल्या बाजारभावात येथील शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च मिळणेही अवघड झालेले आहे. तसेच यावर्षी गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांसह महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर या जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी घटलेली आहे. त्यातच बांग्लादेशने कांदा आयातीवर निर्बंध टाकल्याने व श्रीलंकेत आर्थिक परीस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याची निर्यात ठप्प झालेली आहे. अन्यथा आंदोलने....भारताच्या या दोन्ही प्रमुख आयातदार देशांमध्ये भारतीय कांदा निर्यात होत नसल्याने मागणी अभावी कांद्याची बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. कांदा बाजारभावात घसरण अशाच प्रकारे सुरू राहील्यास केंद्र शासनाच्या ध्येय धोरणांबाबत शेतकरी बांधवांमध्ये असंतोष निर्माण होऊन आंदोलने होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये विक्रीस येत असलेला रब्बी (उन्हाळ) कांदा जास्तीत जास्त प्रमाणात परदेशात निर्यात होणेसाठी कांदा निर्यातीस चालना देणेकामी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी कांदा निर्यातदारांकरीता केंद्र शासनाने यापूर्वी लागू केलेली 10 टक्के कांदा निर्यात प्रोत्साहन योजना दि. 11 जून 2019 पासुन बंद केलेली असल्याने सदरची योजना पुन्हा सुरू करणेत यावी. कांदा निर्यातीसाठी किसान रेल्वे....बांग्लादेशला कांदा निर्यात पुर्ववत सुरू होणेसाठी प्रयत्न करून तेथे रेल्वेद्वारे कांदा पाठविणेसाठी असलेली कोटा सिस्टीम संपुष्टात आणावी व बांग्लादेशसाठी येथील निर्यातदारांना पाहिजे त्या प्रमाणात व वेळेत पाठविणेसाठी किसान रेल किंवा BCN च्या हाफ रॅक देण्याबाबत रेल्वे प्रशासनाने निर्णय घ्यावा. व्यापारी वर्गास कांदा निर्यात करणेसाठी लवकर  कंटेनर मिळत नाही. त्यासाठी 8 ते 10 दिवस प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे कांदा निर्यातीस अडथळा निर्माण होत असल्याने त्वरीत कंटेनर उपलब्ध व्हावे या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Google Follow Image