Country-wise Medal Tally: भारताची एकूण पदससंख्या 20, पदकतालिकेत कितव्या स्थानी, पाहा संपू्र्ण यादी

Abp News | 5 days ago | 05-08-2022 | 01:31 pm

Country-wise Medal Tally: भारताची एकूण पदससंख्या 20, पदकतालिकेत कितव्या स्थानी, पाहा संपू्र्ण यादी

Commonwealth Games 2022 Medal Tally: कॉमनवेल्थ स्पर्धा (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करत तब्बल 20 पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये 6 सुवर्णपदकांचाही समावेश आहे. यामुळे गुणतालिकेत भारत टॉप 10 मध्ये असून ताज्या आकडेवारीनुसार भारत सातव्या स्थानी विराजमान आहे. सातव्या दिवशी भारतासाठी कॉमनवेल्थच्या लॉन्ग जंप इव्हेंटच्या अंतिम सामन्यात भारताचा लांब उडीपटू एम श्रीशंकरनं (Murli Shreeshankar) रौप्यपदक मिळवून दिलं. मुरली श्रीशंकरनं 8.08 मीटर उडी मारत पदकाला गवसणी घातली. तसंच पुरुष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरनं (Sudhir) दमदार कामगिरीच्या जोरावर देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. सुधीरनं पुरुषांच्या हेवीवेटमध्ये 134.5 गुण प्राप्त केले. कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारताचं हे सहावं सुवर्णपदक ठरलं.याशिवाय स्पर्धेच्या सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत अव्वलस्थानी असणारा ऑस्ट्रेलिया आताही 132 पदकांसह अव्वलस्थानी आहेय. तर इंग्लंड 118 पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे. सातव्या दिवशी भारतानं एकूण दोन पदकं जिंकत एकूण पदकसंख्या 20 वर नेली असून सातवं स्थान कायम ठेवलं आहे. तर नेमकी यादी कशी आहे पाहूया...कॉमनवेल्थ 2022 पदकतालिका-भारतासाठी कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी-सुवर्णपदक- 6  (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर)रौप्यपदक- 7 (संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर.)कांस्यपदक- 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह,  तेजस्वीन शंकर.)हे देखील वाचा-

Google Follow Image