Crime News : मित्राची मस्ती तरुणाच्या अंगाशी! हायप्रेशरचा हवेचा पाईप मित्राच्या घातला पार्श्वभागात 

Abp News | 6 days ago | 05-08-2022 | 11:23 pm

Crime News : मित्राची मस्ती तरुणाच्या अंगाशी! हायप्रेशरचा हवेचा पाईप मित्राच्या घातला पार्श्वभागात 

Ambernath latest Crime News : कंपनीतील मित्राची मस्ती एका तरुणाच्या जीवावर आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. कंपनीतील मित्राने या तरुणाच्या पार्श्वभागात हायप्रेशरचा हवेचा पाईप घातला. त्यामुळे या तरुणाला गंभीर स्वरूपाची अंतर्गत दुखापत झाली आहे. अंबरनाथच्या वडोळ गाव परिसरातल्या एका कंपनीत पीडित तरुण काम करतो. गुरुवारी रात्रीपाळीला हा तरुण कामावर आला होता. शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास हा तरुण कंपनीत मशीनवर काम करत होता. त्यावेळी त्याचा एक सहकारी मित्र तिथे आला आणि मस्ती म्हणून हवेचा हायप्रेशरचा पाईप या तरुणाच्या पार्श्वभागात घातला. यामुळे ही हायप्रेशरची हवा तरुणाच्या आतड्यांमध्ये गेली. त्यामुळे त्या तरुणाला गंभीर स्वरूपाची अंतर्गत दुखापत झाली आणि तो क्षणार्धात खाली कोसळला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. यावेळी त्या तरुणाच्या मित्राने त्याला उचलून तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल. सध्या या तरुणावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या तरुणाच्या प्रकृती बद्दल डॉक्टरांना विचारलं असता, या तरुणाला तपासल्यानंतर त्याचं तातडीने ऑपरेशन करण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच त्याची प्रकृती सध्या अतिशय नाजूक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र या घटनेमुळे पीडित तरुणाचे कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली असून, ज्या तरुणाने ही मस्ती केली आहे त्याच्यावर पोलीस कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून पोलीस ही चक्रावले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी थेट रुग्णालयात दाखल असलेला पीडित कामगाराची भेट घेतली, आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेचं नेमकं कारण काय असू शकतं? याचा तपास सध्या पोलिसांनी सुरु केलाय. पोलिसांनी सुरुवातीला रुग्णालयात आणि नंतर कंपनीत जाऊन चौकशी केली. तर या तरुणाने हा प्रकार मस्तीत घडला असल्याचं सांगितलं असून आपल्याला कोणतीही तक्रार करायची नसल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. मात्र या प्रकारामुळे आपली मस्ती एखाद्याच्या कशी जीवावर बेतू शकते, हे समोर आलं आहे.

Google Follow Image