CWG 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान सुरक्षेत मोठ्या त्रुटी, कुस्तीचे सामने थांबवत मैदानही केलं रिकामं

Abp News | 6 days ago | 05-08-2022 | 05:03 pm

CWG 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान सुरक्षेत मोठ्या त्रुटी, कुस्तीचे सामने थांबवत मैदानही केलं रिकामं

Commonwealth Games Day 8 : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतील (Commonwealth Games 2022) कुस्ती सामने मध्येच थांबवण्यात आले आहेत. सोबतच संपूर्ण स्टेडियमही रिकामे करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता कुस्तीचे अंतिम सामनेही लांबणार आहेत. भारताच्या बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी पहिली फेरी जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ट्वीट करत माहिती दिली की, "आम्ही सुरक्षा तपासणीसाठी खेळ थांबवत आहोत. परवानगी मिळाल्यावर खेळ पुन्हा सुरू होतील." दरम्यान आता भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:15 वाजता कुस्तीचे सामने पुन्हा सुरू होणार आहेत. Wrestling events stopped at #CommonwealthGames2022 due to expected security concerns"We are taking a short pause for a safety check and will resume action once we receive the go-ahead," tweets United World Wrestling pic.twitter.com/KHZHgff7Em बजरंगसह दीपक विजयीआज पार पडलेल्या कुस्ती सामन्यात भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी कमाल करत आपले पहिले सामने जिंकले आहेत. बजरंगने नॉरूच्या लॉवे बिंघमला 4-0 ने तर दीपक पुनियाने न्यूझीलंडच्या मॅथ्यूला 10-0 ने मात दिली.आजचं कुस्ती स्पर्धेचं वेळापत्रकपहिले सत्र दुपारी 3 वाजल्यापासूनउपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 125 किलो: मोहित ग्रेवालउपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 65 किलो: बजरंग पुनियाउपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष 86 किलो: दीपक पुनियाउपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, महिला 57 किलो: अंशु मलिकउपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, महिला 62 किलो: साक्षी मलिकउपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, महिला 68 किलो: दिव्या काकरनदुसरे सत्र रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु (सामना थांबवण्यात आल्याने वेळेत बदल अपेक्षित)कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला 57 किलो (अंशु मलिकने पात्रता मिळवल्यास)कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 65 किलो (बजरंग पुनियाने पात्रता मिळवल्यास)कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला 62 किलो (साक्षी मलिकने पात्रता मिळवल्यास)कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 86 किलो (दीपक पुनियाने पात्रता मिळवल्यास)कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिल 68 किलो (दिव्या काकरनने पात्रता मिळवल्यास)कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष 125 किलो (मोहित ग्रेवालने पात्रता मिळवल्यास)हे देखील वाचा-

Google Follow Image