Abp News | 4 days ago | 05-08-2022 | 10:31 pm
Wrestling in Commonwealth 2022 : भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) आज आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang punia) याने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या मॅकनील याला मात देत ही कामगिरी केली आहे. भारताचं स्पर्धेतील हे सहावं सुवर्णपदक असून 21 वं पदक आहे.Indian wrestler Bajrang Punia beats Canada's McNeil Lachlan in the men's freestyle 65 Kg weight category final to clinch the gold medal. This is seventh gold India has won so far in #CommonwealthGames2022 pic.twitter.com/ops2hbwGvZ आज कुस्ती सामन्यांना सुरुवात होताच कुस्तीमध्ये भारताचे कुस्तीपटू कमाल कामगिरी करत आहेत. दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलोग्राम फ्रीस्टाइल गटात राऊंड 16 मध्ये नॉरूच्या लॉवे बिंघमला 4-0 ने मात देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर बजरंगने आधी उपांत्यपूर्व फेरीत मॉरीशसच्या कुस्तीपटूला आणि नंतर उपांत्य फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेनुसार इंग्लंडच्या जॉर्ज रॅमला मात देत फायनल गाठली. आता फायनलमध्ये त्याने कॅनडाच्या मॅकनील याला 9-2 ने मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.अंशूकडे रौप्य तर दीपकसह साक्षी गोल्डसाठी लढणारमहिला कुस्तीपटू अंशू मलिकने (Anshu Malik) नुकतंच रौप्य पदक मिळवून दिलं आहे. 57 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात तिला नायजेरियाच्या Adekuoroye हिने मात दिल्यामुळे अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. दुसरीकडे दीपक पुनिया आणि साक्षी मलिक हे फायनलमध्ये पोहोचल्याने त्याचं पदकही निश्चित झालं आहे.हे देखील वाचा-