Dhule : महापालिकेच्या शाळेत पाणी साचलं, शिक्षण 'पाण्यात'; विद्यार्थ्यांवर आली आंदोलनाची वेळ

Abp News | 1 week ago | 06-08-2022 | 07:13 am

Dhule : महापालिकेच्या शाळेत पाणी साचलं, शिक्षण 'पाण्यात'; विद्यार्थ्यांवर आली आंदोलनाची वेळ

Dhule School News : धुळे महापालिकेच्या (Dhule Manapa) शाळांकडे महापालिकेचे कमालीचे दुर्लक्ष झाले असल्याची चित्र सध्या बघायला मिळत आहे. त्यामुळे मनपाच्या शाळांचे भवितव्य धोक्यात आले असून विद्यार्थ्यांचे शिक्षणही 'पाण्यात ' जाण्याची भीती निर्माण झाली आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे धुळे शहरातील मनपाच्या शाळा क्रमांक 20 मध्ये गुढघ्याएवढे पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही कठीण झाले आहे. परिणामी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह विद्यार्थी आणि पालकांना महापालिकेत येवून आंदोलन करावे लागले. या शाळेच्या कामातून टक्केवारी मिळणार नसल्यानेच शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.धुळे महापालिकेच्या शाळा क्रमांक 20 मध्ये नेहमीच पावसाचे पाणी साचत असते. त्यामुळे या शाळेच्या आवारात मुरुम टाकावा, अशी मागणी सातत्याने होत होती. परंतु, धुळे महापालिकेने कायम दुर्लक्षच केले आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मनपा शाळा क्र.20 च्या आवारात गुढघाभर पाणी साचल्याने आज सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. सकाळी शाळेच्या पूर्ण वेळ विद्यार्थी शाळेबाहेरच थांबून होते.याबाबत धुळे महापालिका शाळा क्रमांक 20 चे अध्यक्ष जमिल शाह यांनी मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना माहिती दिली. त्यानंतर दोन तास वाट पाहुन देखील शाळेजवळ कोणी फिरकले नाही. त्यामुळे संताप अनावर झाल्याने अध्यक्ष जमील शाह, उपाध्यक्ष अताऊर्रहेमान आदींनी विद्यार्थ्यांसह महापालिका गाठली आणि आयुक्त देवदास टेकाडे यांच्या दालनाबाहेर विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी आंदोलन केले. धुळे मनपाच्या उदासिनतेमुळे विद्यार्थ्यांवरही आंदोलन करण्याची वेळ आल्याचे विदारक चित्र आज धुळे महानगरपालिकेत दिसून आले.प्रशासनाच्या या उदासीनतेमुळं विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.इतर महत्वाच्या बातम्याDhule : साक्री तालुक्यात सर्वाधिक पावसाची हजेरी, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; अद्याप पंचनामे अपूर्णMaharashtra Rains : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

Google Follow Image