Eknath Shinde : कोर्टाच्या निर्णयानंतरही माघार नाही, आता शिंदे गटाचे पुढचे पाऊल काय?

Tv 9 | 1 week ago | 23-09-2022 | 10:05 pm

Eknath Shinde : कोर्टाच्या निर्णयानंतरही माघार नाही, आता शिंदे गटाचे पुढचे पाऊल काय?

राजेंद्र खराडे | Sep 23, 2022 | 8:41 PM मुंबई : दसरा मेळावा (Dussehra Gathering) हा एक कार्यक्रमच राहिला नाही तर तो प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानंतर शिवसेनेचा शिवतीर्थावर मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असतानाही शिंदे गटानेही अद्यापही माघार घेतलेली नाही. उच्च न्यायालयाने असा निर्णय दिल्यानंतर आता शिंदे गट (Eknath Shinde) हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. शिवतीर्थावर शिवसेनेला परवानगी मिळू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हे शिंदे गटाकडून केले जात आहेत. उच्च न्यायालयाच्या विरोधात शिंदे गट हा सुप्रिम कोर्टात दाद मागणार आहे. त्यामुळे शिंदे गटाने जर तसे पाऊल उचलले तर पुन्हा काय होणार ? हा प्रश्न कायम आहे. शिंदे गटाच्या वकिलाने सांगितल्याप्रमाणे हा गट सुप्रीम कोर्टात दाद मागणार हे निश्चित आहे.

Google Follow Image