दिल्लीत आगीचा भडका, इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये हाहाकार, अग्निशमन दलाच्या 23 गाड्या घटनास्थळी

Tv 9 | 1 week ago | 25-11-2022 | 03:05 am

दिल्लीत आगीचा भडका, इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये हाहाकार, अग्निशमन दलाच्या 23 गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : दिल्लीत आगीची मोठी आणि दुर्देवी घटना घडलीय. भागीरथी पॅलेस इलेक्ट्रॉनिक मार्केट परिसरात भीषण आग लागलीय. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अग्निशमन दलाच्या 23 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. संबंधित परिसर दाटीवाटीचा असल्याने आग विझवण्याच्या कामात अडथळा येतोय.संबंधित मार्केट हे पूर्णपेणे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं आहे. आग नेमकी का लागली ते सध्या तरी समजू शकलेलं नाही. पण आगीने आक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे.Massive fire breaks out at Bhagirath Palace market in Chandni Chowk, Delhi pic.twitter.com/YBSZPJKtA3— Hemant Rajaura (@hemantrajora_) November 24, 2022आगीची घटना घडल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. परिसरात धुरांचं साम्राज्य निर्माण झालं. नागरीक मार्केटमध्ये बाहेर पडण्यासाठी धावू लागले.या दरम्यान आगीत इलेक्ट्रॉनिक वस्तू जळू लागल्या. त्यामुळे आग आणखी भडकली. पाहतापाहता संपूर्ण मार्केट परिसरावर आगीने ताबा मिळवला. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आग लागली त्यावेळी मार्केट बंद होती, अशी देखील माहिती समोर येतेय.

Google Follow Image