'हॅलो डॉक्टर, मी एकनाथ शिंदे बोलतोय, कार्यकर्त्याची काळजी घ्या'; प्रचंड व्यस्ततेतून शिंदेंचा कार्यकर्त्यासाठी फोन

Abp News | 4 days ago | 24-06-2022 | 01:28 pm

'हॅलो डॉक्टर, मी एकनाथ शिंदे बोलतोय, कार्यकर्त्याची काळजी घ्या'; प्रचंड व्यस्ततेतून शिंदेंचा कार्यकर्त्यासाठी फोन

Eknath Shinde News : एकनाथ शिंदे सध्या किती बिझी असतील हे सांगायला नकोच. मात्र अशा प्रचंड व्यस्ततेतून देखील ते कार्यकर्त्यांसाठी वेळ काढत असल्याचं समोर आलं आहे. डोंबिवलीत उपचार घेत असलेल्या कार्यकर्त्याची त्यांनी फोनवरुन विचारपूस केली आहे. 'हॅलो डॉक्टर, मी एकनाथ शिंदे बोलतोय. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा. माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विनंती'. हे संभाषण होत एकनाथ शिंदे यांचं. डोंबिवलीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर बोलणे केलं. महाराष्ट्रात एवढं मोठा राजकीय भूकंप झाला असून सरकार पडेल? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. आपल्या राजकीय कामात गुंतले असतानाही शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची फोनवरून चौकशी केल्याबद्दल शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.डोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी यांची 21 तारखेला अचानक बिघडल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवसैनिकाची तब्येत बिघडल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली. 23 तारखेला सायंकाळी साडे पाच वाजता शिंदेंनी डॉक्टरांना कॉल केला.आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची काळजी घ्या म्हणत विचारपूस केली.   एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेचं वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून कोरोना काळात तसेच त्या आधीपासूनच रुग्णांना मदत करण्याचं काम केलं जात आहे. शिंदे बंडखोर आमदारांसह गुवाहाटीमध्येएकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आमदारांसह आधी सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठलं. आता शिंदे गटाकडून त्यांच्याकडे 48 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत बंड पुकारलं आहे. यानंतर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे.  इतर महत्वाच्या बातम्याSanjay Raut :  शिंदे गटाची वेळ संपली, आता आमची वेळ; संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना चॅलेंजअजय चौधरी, सुनील प्रभूंच्या नियुक्तीविरोधात एकनाथ शिंदे हायकोर्टात जाणारशिंदे गटाचे 12 आमदार निलंबित केल्यानं काय साधणार? 'मविआ'ची फ्लोअर टेस्ट सोपी होईल?

Google Follow Image