IND vs AUS 2022: भारतीय क्रिकेटपटूने केला हर्षल पटेलचा बचाव, सांगितलं कारण...

Tv 9 | 2 weeks ago | 23-09-2022 | 08:05 am

IND vs AUS 2022: भारतीय क्रिकेटपटूने केला हर्षल पटेलचा बचाव, सांगितलं कारण...

मंगळवारी मोहोलीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) मुख्य गोलंदाजांची चांगली धुलाई झाली. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर चाहत्यांनी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि हर्षल पटेल या मुख्य गोलंदाजांवरती जोरदार टीका केली. कारण आशिया चषकात सुद्धा भुवनेश्वर कुमारने चांगली कामगिरी केली नव्हती. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावरती जोरदार टीका सुरु आहे.ऑस्ट्रेलिया टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने चांगली सुरुवात केल्याने आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने 208 एवढी मोठी धावसंख्या उभारली. त्यामध्ये केएल राहूल, हार्दीक पांड्या आणि सुर्यकुमार यादव यांनी उत्तुंग षटकार खेचले.गोलंदाज भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल या दोघांच्या गोलंदाजीवरती ऑस्ट्रेलियाच्या टीमने 108 धावा काढल्या. त्यामुळे दोन्ही गोलंदाजांवरती मंगळवारी चाहत्यांनी जोरदार टीका केली.टीम इंडियाचा क्रिकेटपटू अजय जडेजाने मात्र हर्षल पटेलची बाजू घेतली आहे. कारण त्याने सांगितलं आहे की, हर्षल पटेलचा मंगळवारचा दिवस नव्हता. परंतु त्यांच्या गोलंदाजांमध्ये एक वेगळेपण आहे आणि ते पुढच्या मॅचमध्ये चाहत्यांना पाहायला मिळेल.मंगळवारी झालेल्या सामन्यात हर्षल पटेलच्या चार ओव्हरमध्ये 49 धावा काढल्या, तसेच हर्षल पटेल त्या सामन्यात विकेट सुद्धा मिळाली नाही.

Google Follow Image