Ind vs Aus 2nd T20: परफेक्ट फिनिशर, दोन बॉलमध्ये Dinesh Karthik ने आपल्या स्टाइलमध्ये मॅच संपवली, पहा VIDEO

Tv 9 | 1 week ago | 24-09-2022 | 08:05 am

Ind vs Aus 2nd T20: परफेक्ट फिनिशर, दोन बॉलमध्ये Dinesh Karthik ने आपल्या स्टाइलमध्ये मॅच संपवली, पहा VIDEO

मुंबई: T20 सीरीजमध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय आवश्यक होता. टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पिछाडीवर होती. त्यामुळे नागपूरमधील दुसरा टी20 सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा होता. टीम इंडियाने या मॅचमध्ये 6 विकेट आणि 4 चेंडू राखून बाजी मारली. टीमच्या विजयात कॅप्टन रोहित शर्मा, अक्षर पटेल यांनी मोलाच योगदान दिलं. या दोघांप्रमाणेच दिनेश कार्तिकने सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्यासमोर सुद्धा आव्हान सोपं नव्हतं.चॅलेंजिग परिस्थिती होतीदिनेश कार्तिकचा फिनिशर म्हणून टीम इंडियात समावेश केलाय. कालच्या मॅचमध्ये त्याने आपली भूमिका अगदी चोख बजावली. दिनेश कार्तिक जेव्हा, जेव्हा क्रीजवर जातो, तेव्हा त्याच्यासमोर आव्हानात्मक परिस्थिती असते. कालच्या मॅचमध्येही तशीच स्थिती होती. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असेल, तर धावगती वाढवण्यासाठी फटकेबाजी आवश्यक असते किंवा धावांचा पाठलाग करत असेल, तर कमी चेंडूत जास्त धावा हव्या असतात.सगळ्यांच्या नजरा दिनेशकडे लागल्या होत्याकाल दिनेश कार्तिक खेळपट्टीवर गेला, तेव्हा फक्त 7 चेंडू शिल्लक होते. लास्ट ओव्हरच्या पहिलाच चेंडू दिनेश खेळणार होता. टीम इंडियाला विजयासाठी 6 चेंडूत 9 धावांची गरज होती. स्टेडियममध्ये आणि टीव्हीसमोर बसलेले क्रिकेट चाहत्यांच्या नजरा दिनेशकडे लागल्या होत्या. अनेकांच्या ह्दयाची धडधड वाढली होती.समोर कोण गोलंदाज होता?कारण सीरीजमधील आव्हान जिंवत ठेवण्यासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक होता. समोर ऑस्ट्रेलियाचा डॅनियल सॅम्स गोलंदाजी करत होता. हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये हा डॅनियल सॅम्स मुंबई इंडियन्सकडून खेळतो.This is why we need Dinesh Karthik in the team! This is what he is capable of doing right from the first ball!#DineshKarthik #INDvsAUS pic.twitter.com/vTEBrfcuHI— JAGAN2024 (@DaraYsrcp) September 23, 2022दोन बॉलमध्ये मॅच फिनिशत्याच्या पहिल्याच चेंडूवर दिनेशने मिडविकेटला षटकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर जोरदार चौकार मारला. त्यानंतर स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. दिनेश कार्तिकने दोन बॉलमध्येच मॅच संपवून टीम इंडियाला आवश्यक विजय मिळवून दिला. मालिकेत आता दोन्ही टीम्स 1-1 बरोबरीत आहेत. रविवारी हैदारबादमध्ये होणाऱ्या फायनलकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Google Follow Image