IND vs AUS T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत सामन्यावर संकटाचे ढग, टॉसला विलंब

Tv 9 | 1 week ago | 23-09-2022 | 10:05 pm

IND vs AUS T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत सामन्यावर संकटाचे ढग, टॉसला विलंब

नागपूर : पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind Vs Aus) टीम इंडिया नागपुरात (Nagpur) आमनेसामने आहेत. दुसरा टी-20 (t20) सामना नागपुरात खेळवला जातोय. एकीकडे या सामन्यावर पावसाचं सावट असून नाणेफेकला यामुळे उशिर झालाय. टीम इंडियानं जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागलाय. 208 धावा करूनही टीम इंडियाच्या हाती मागच्या सामन्यात पराभव आला. पण, आता विजयी होण्याचा उद्देश घेऊन टीम इंडियात मैदानात उतरेल.Update – Toss delayed due to wet outfield. Inspection at 7 PM IST#INDvAUS— BCCI (@BCCI) September 23, 2022टीम इंडिया, संभाव्य प्लेइंग इलेव्हनकेएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल/दीपक चहर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराहऑस्ट्रेलिया, संभाव्य प्लेइंग इलेव्हनअ‍ॅरॉन फिंच, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अ‍ॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.दोन्ही संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन आम्ही तुम्हाला सांगत आहोत. पण, सामन्यापूर्वी म्हणजे ऐनवेळी यात बदलही होऊ शकतो.इंग्लंड दौऱ्यानंतर बुमराहनं एकही सामना खेळलेला नाही. पाठदुखीनं तो आशिया कपमध्ये खेळू शकलेला नाही. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली होती. पण, मोहालीतील पहिल्या सामन्यात संघ व्यवस्थापनानं त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेलं नाही.बुमराह ता पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, जसप्रीत बुमराह दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसू शकतो, असंही बोललं जातंय.

Google Follow Image