Abp News | 4 days ago | 22-06-2022 | 10:35 pm
India vs Leicestershire match : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांना (india vs england) 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे. यावेळी कसोटी, टी20 आणि एकदिवसीय हे सामने खेळवले जाणार असून यापूर्वी भारतीय संघ वॉर्मअप सामने खेळणार आहे. यातील पहिला सामना उद्यापासून (23 जून) भारत विरुद्ध लीसेस्टरशायर (India vs Leicestershire) असा खेळवला जाईल.ही केवळ एक वॉर्मअप मॅच असून खेळाडूंना योग्य सराव व्हावा यासाठी खेळवली जात असल्याने इंग्लंड, भारत तसंच लीसेस्टरशायर या तिनही संघातील खेळाडू एकत्र खेळतील. त्यामुळे भारताचे दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि प्रसिध कृष्णा हे लीसेस्टरशायर संघातून खेळणार आहेत. दरम्यान या वॉर्म अप सामन्यासाठी दोन्ही संघ जाहीर झाले असून भारतीय संघाचं नेतृत्त्व रोहित शर्मा तर लीसेस्टरशायर संघाचा कर्णधार सॅम इवान्स असणार आहे. भारतीय संघातबी उमेश यादव, शुभमन गिल यासारख्या खेळाडूंच पुनरागमन झालं आहे.अशी आहे अंतिम 11भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादवलीसेस्टरशायर : सॅम इवान्स (कर्णधार), रेहान अहमद, सॅम बेट्स (यष्टीरक्षक, नॅट बोवली, विल डेविस, जोई एविसन, लुविस किंबर, अबी सकांडे, रोमन वॉल्कर, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिध कृष्णाहे देखील वाचा-