Job Majha : विद्युत विभाग गोवा आणि उमरगा जनता सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील 

Abp News | 2 days ago | 22-06-2022 | 04:58 pm

Job Majha : विद्युत विभाग गोवा आणि उमरगा जनता सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील 

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. विद्युत विभाग गोवा, उस्मानाबाद येथील उमरगा जनता सहकारी बँक आणि मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. विद्युत विभाग, गोवापोस्ट ; लाईन हेल्परशैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल लाईन्स बांधकामावर काम करण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव, कोकणी भाषेचं ज्ञान असलेल्यांना प्राधान्य दिलं जाईल.एकूण जागा : 255वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंतनोकरीचं ठिकाण : गोवाऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 जुलै 2022तपशील : www.goaelectricity.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर whats new मध्ये Advertisement for post of line helpers ही लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)उमरगा जनता सहकारी बँक उस्मानाबादपोस्ट : अधिकारी, आयटी अधिकारी, लिपिक, शिपाईशैक्षणिक पात्रता : अधिकारी पदासाठी बँकींग क्षेत्रातला पाच वर्षांचा कामाचा अनुभव, कोणत्याही शाखेतून पदवीधर, IT अधिकारी पदासाठी कम्प्युटर पदवी, पाच वर्षाचा कामाचा अनुभव, लिपिक पदासाठी पदवीधर, कामाचा अनुभव, शिपाई पदासाठी किमान 12 वी पास, अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल.एकूण जागा : 06ऑफलाईन, ऑनलाईन पद्धतीनेही तुम्ही अर्ज पाठवू शकता.अर्ज पाठवण्याचा पत्ता - अध्यक्ष, उमरगा जनता सहकारी बँक लिमिटेड, माणिकवार कॉम्प्लेक्स मेन रोड, उमरगा- ४१३६०६अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - omerga janta bank@yahoo.in अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2022मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणेएकूण 32 जागांसाठी भरती होत आहे.सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी आपण विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.पोस्ट - MTS (मेसेंजर)शैक्षणिक पात्रता - मेट्रिक पास किंवा समतुल्य, १ वर्ष कामाचा अनुभवएकूण जागा - 14पोस्ट - LDCशैक्षणिक पात्रता - 12 वी पास, कम्प्युटरवर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि., हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.एकूण जागा : 08पोस्ट - MTS (सफाईवाला)शैक्षणिक पात्रता - मेट्रिक पास, १ वर्षाचा कामाचा अनुभवएकूण जागा : 05 या सोबतच स्टेनो ग्रेड -II, कुक, MTS draftary पदासाठी प्रत्येकी  एक आणि MTS (चौकीदार) पदासाठी २ जागा आहेत. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षनोकरीचं ठिकाण : पुणेऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 जुलै 2022 तपशील - www.hqscrecruitment.com  (या वेबसाईटवर गेल्यावर advertisement वर क्लिक करा. तुम्हाला थेट जाहिरात दिसेल. विस्ताराने माहिती मिळेल.)

Google Follow Image