कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, हे तुम्ही ठरवा, सुरुवात सुनील प्रभूंपासून करा; सरनाईक-गोगावले यांच्यातील संभाषण व्हायरल

Abp News | 2 days ago | 23-06-2022 | 09:39 am

कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, हे तुम्ही ठरवा, सुरुवात सुनील प्रभूंपासून करा; सरनाईक-गोगावले यांच्यातील संभाषण व्हायरल

Maharashtra Political Crisis : गुवाहाटी : गुवाहाटीमध्ये रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या असलेल्या शिंदेसेनेची रणनीती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांच्यातील संभाषण कॅमेऱ्यात कैद झालं आहे. शिंदे गटाने महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. आता पक्षातून कोणाला काढायचं, कोणाला ठेवायचं यावर प्रताप सरनाईक  आणि गोगावले यांच्यातलं संभाषण कॅमेऱ्यात कैद झालं आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे संभाषण सुरु आहे आणि शिंदे गटाच्या निशाण्यावर सर्वप्रथम सुनील प्रभू असल्याचं कळतं.भरत गोगावले यांनी प्रतोदपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक म्हणाले की, "आता हे प्रतोदाचं काम काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे ना? तुमची जबाबदारी आता वाढली आहे. शिवसेना पक्षाची फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. सर्व आमदारांना टिकवून ठेवा, त्यांना बोलायला द्या." त्यावर "हो सगळं व्यवस्थित करतो," असं भरत गोगावले यांनी म्हटलं. त्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी, "केलंच पाहिजे सगळं व्यवस्थित, मागच्या प्रतोदासारखं करु नका," अशी टिप्पणी केली. यावर प्रताप सरनाईक म्हणाले की, "मागचे प्रतोद मुंबईच्याच लोकांना जास्त बोलायला द्यायचे. तुम्ही आता प्रतोद आहात, पक्षात कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, हे आता तुम्ही ठरवा. सुरुवात सुनील प्रभू यांच्यापासून करा."सुनील प्रभू यांना प्रतोद पदावरुन बेदखलशिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी काल (22 जून) बंडखोर आमदारांना एक पत्र पाठवलं होतं. वर्षा बंगल्यावर पाच वाजता होणाऱ्या बैठकीला हजर राहा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा या पत्रातून बंडखोर आमदारांना देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने आमच्याकडे शिवसेना आमदारांचे जास्त संख्याबळ असल्याचं सांगत सुनील प्रभू यांनाच प्रतोदपदावरुन बेदखल केलं होतं. शिंदे गटाकडून आता त्यांच्या गटाच्या प्रतोदपदाची जबाबदारी महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यावर देण्यात आली आहे.Eknath Shinde : शिंदे गटाच्या निशाण्यावर सुनील प्रभू, प्रताप सरनाईक-भरत गोगावले यांच्यातलं संभाषण

Google Follow Image