'कुणालाही मारहाण, जबरदस्ती नाही'; एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांकडून संजय राऊतांच्या आरोपाचं खंडन 

Abp News | 4 days ago | 22-06-2022 | 09:53 am

'कुणालाही मारहाण, जबरदस्ती नाही'; एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांकडून संजय राऊतांच्या आरोपाचं खंडन 

Maharashtra Shiv Sena MLA Latest Updates : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकल्यानंतर खळबळ उडाली आहे. अशात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांना सूरतमध्ये मारहाण झाल्याचा आरोप केला होता. मात्र राऊत यांचा हा आरोप स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांनी फेटाळून लावला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, सगळेजण आनंदात आहेत, कुणालाही मारहाण, जबरदस्ती करण्यात आलेली नाही. आमदारांच्या मनात अनेक वर्षांपासून खदखद आहे, असं शिंदे यांनी म्हटलं.आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं की, आम्ही सर्वजण सोबत आहोत. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराजी आहे, असं ते म्हणाले. हे सर्व आमदार आहेत. त्यांना मारुन मुकटून कसं ठेवतील. आमदार छोटा माणूस नसतो की त्याला मारुन बसवू शकू. आम्ही आमच्या मर्जीनं आणि एकदिलानं इथं आहोतं. आमदार नितीन देशमुख यांची तब्येत व्यवस्थित आहे, असंही शिरसाट यांनी सांगितलं.संजय राऊतांनी काय म्हटलं होतं...संजय राऊत यांनी शिवसेनेच्या काही आमदारांना मारहाण झाल्याचा आरोप केला होता. तसेच सामनाच्या अग्रलेखातही यावर भाष्य करण्यात आलं होतं. त्यात म्हटलं होतं की, शिवसेनेच्या दहाएक आमदारांना 'उचलून' गुजरातला नेण्यात आले. त्यांच्या भोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. यातील दोन-चार आमदारांनी या गराड्यातून सुटण्याचा व पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शारीरिक इजा होईपर्यंत मारहाण करण्यात आली. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना तर इतकी मारहाण झाली की त्यांना हृदयविकाराचा झटका आला व इस्पितळात दाखल करावे लागले. कैलास पाटील हे आमदार घेराबंदीतून सटकले आणि भर पावसात चालत रस्त्यावर येऊन कसेबसे मुंबईस पोहोचले. अशाप्रकारे चार-पाच आमदारांनी सुटकेचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात पोलिसांनी त्यांना अटक करून 'ऑपरेशन कमळ'वाल्यांच्या ताब्यात दिले, असा आरोप करण्यात आला होता. इतर महत्वाच्या बातम्याशिंदेंसोबत शिवसेनेचे नेमके आमदार किती? शिंदे म्हणतात 40 तर कुणी म्हणतंय 33, कुणी म्हणतंय 35... महाराष्ट्रावर वार! एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजप 'ऑपरेशन कमळ' घडवतंय; सामनातून हल्लाबोल महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात; कोण आहेत CR पाटील?

Google Follow Image