Legends League : 13 चेंडूत 64 धावा, गंभीरच्या जोडीदाराची सुपर फटकेबाजी

Tv 9 | 2 weeks ago | 22-09-2022 | 08:05 am

Legends League : 13 चेंडूत 64 धावा, गंभीरच्या जोडीदाराची सुपर फटकेबाजी

मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेली लेजेंड्स लीग (Legends League) ही स्पर्धा पुन्हा चाहत्यांचे मनोरंजन करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण माजी खेळाडू पुन्हा चांगला खेळ करताना दिसत आहेत. ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (ICC) अधिक खेळण्याची संधी मिळाली नाही, असे खेळाडू आता चमकदार कामगिरी करीत आहेत. टीम इंडियाचे (Team India) माजी खेळाडू सुद्धा अधिक चांगली कामगिरी करीत आहेत.ज्या माजी खेळाडूंना विविध कारणामुळे आंतरराष्ट्रीय खेळामधून बाहेर पडावं लागलं. त्यापैकी एक म्हणजे सोलोमन मीर आहे. त्याने काल इंडीया कॅपिटल टीमकडून खेळताना चांगली कामगिरी केली. त्याची फटकेबाजी पाहून मैदानात चाहते खूष झाले.लखनौमध्ये झालेल्या कालच्या सामन्यात इंडिया कॅपिटल्सने भिलवाडा किंग्जचा 78 धावांनी पराभव केला.गौतम गंभीर कर्णधार असलेल्या इंडिया कॅपिटल्सने 198 इतकी मोठी धावसंख्या उभारली होती. त्यामध्ये झिम्बाब्वेचा माजी फलंदाज सोलोमन मीर याने फक्त 38 चेंडूत 82 धावा केल्या.सोलोमन मीरने गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली. त्यामुळे प्रेक्षकांना मैदानात षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. विशेष बाब म्हणजे सोलोमनने केवळ 13 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर आपल्या डावात 64 धावा लुटल्या.सोलोमन मीर हा चांगला झिम्बाब्वेचा फलंदाज होता. परंतु त्याच्यावर काही राजकीय हस्तक्षेप केल्याचा त्यांच्यावर झाला होता. त्यानंतर त्याला कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेता येणार नाही असं पत्र देण्यात आलं. त्यामुळे त्याने क्रिकेटमधून संन्यास घेतला.

Google Follow Image