Maharashtra Corona Update : दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, बुधवारी 3260 नव्या रुग्णांची नोंद

Abp News | 5 days ago | 22-06-2022 | 08:12 pm

Maharashtra Corona Update : दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, बुधवारी 3260 नव्या रुग्णांची नोंद

Maharashtra Coronavirus Update : राज्यात बुधवारी दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायाला मिळाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी राज्यात चारशे रुग्ण कमी आढळले आहेत. मंगळवारी राज्यात 3659 कोरोना रुग्ण आढळले आहेत. बुधवारी ही संख्या 3260 वर आली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात 3533 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.83% एवढे झाले आहे. बुधवारी राज्यात नव्या रुग्णांची संख्या 3260 इतकी आहे. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.86% एवढा झाला आहे. राज्यात बी ए.5 व्हेरीयंटचे आणखी 6 रुग्ण:- बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे आणि भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, (नीरी) नागपूर  यांच्या ताज्या अहवालानुसार  बीए.5 व्हेरीयंटचे 6 रुग्ण आढळले आहेत. यापैकी पुणे येथे 5 तर नागपूर येथे 1  रुग्ण आढळून आला आहे. यापैकी 5 महिला तर एक पुरुष आहे. यापैकी 3 रुग्ण हे 20 ते 35 वर्षे वयोगटातील आहेत तर उर्वरित तिघे 50 वर्षे वयापेक्षा अधिक वयोगटातील आहेत. हे सारे रुग्ण दिनांक 6 जून ते 12 जून या कालावधीत कोविड बाधित आढळलेले आहेत. या 6 रुग्णांपैकी 5 जणांचे लसीकरण झालेले आहे. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.4 आणि बीए.5 रुग्णांची संख्या 25 झाली आहे. या पैकी पुण्यात 15, मुंबईत 5,नागपूर येथे 3 तर ठाण्यात 2 आढळले आहेत.सक्रिय रुग्णसंख्या वाढली -  राज्यात आज रोजी एकूण 24639 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबई आणि ठाण्यामध्ये आहेत. मुंबईमध्ये 13501 तर ठाण्यामध्ये 5621 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर रायगडमध्ये 1028, पुण्यात 2310 सक्रिय रग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद - आज राज्यात 3260 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 79,45,022 झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे. राज्यातील 60 टक्के रुग्ण एकट्या मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये आज 1648 नवे रुग्ण आढळले आहेत. तर ठाणे मनपा 263, नवी मुंबई मनपा 328, पनवेल मनपा 114, पुणे मनपा 265, पिंपरी चिंचवड मनपा 103 नवे रुग्ण आढळले आहेत. 

Google Follow Image