Maharashtra Political Crisis :

Abp News | 6 days ago | 22-06-2022 | 11:29 am

Maharashtra Political Crisis :

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात एकीकडे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या अन्य आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे राज्यातील उद्धव सरकार अडचणीत सापडलंय, तर दुसरीकडे ते वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कालपासून पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच, शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. बुधवारी सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.शिवसेनेचे पोस्टर वॉरया पोस्टरमध्ये असं लिहिलंय की, "तुमचा घमंड 4 दिवसांचा आहे, आमची बादशाही तर खानदानी आहे." शिवसेनेच्या नगरसेविका दिपमाला बढे यांनी हा बॅनर लावला आहे. या पोस्टरमध्ये संजय राऊत यांचा मोठा फोटो लावण्यात आला असून हे पोस्टर सध्या चर्चेत आहे आहे. Maharashtra | A banner, reading 'Your arrogance would last 4 days, our kingship is inherited', seen outside the residence of Shiv Sena leader Sanjay Raut in Mumbai.The banner has been put up by Shiv Sena Corporator Deepmala Badhe. pic.twitter.com/N4WkJA0riB राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे परततीलपत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पक्षाची प्रतिष्ठा सर्वोच्च आहे. पक्षापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर राऊत पुढे म्हणाले की, भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही. एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणी सुरू असून ते खरे शिवसैनिक आहेत आणि परत येतील. मुंबई ते सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी येथे या आमदारांना हलवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये पोहोचल्यानंतर 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 33 आमदार आणि 7 अपक्षही पोहोचले आहेत. या सर्वांना गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू येथे थांबविण्यात आले आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजप नेते सुशांत बोरगोहेन आणि पल्लब लोचन दास तेथे पोहोचले होते. सुशांत बोरगोहेन म्हणाले- “मी या आमदारांना गुवाहाटीला न्यायला आलो आहे. वैयक्तिक संबंधांमुळे मी त्यांना घेण्यासाठी येथे आलो आहे. येथे किती आमदार आले याची मी मोजणी केलेली नाही. सत्ता जाईल, सत्ता पुन्हा मिळवता येते, पण पक्षाचीही प्रतिष्ठा असते - संजय राऊतराजकारणात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. यासर्व घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, सत्ता पुन्हा मिळवता येते, पण पक्षाचीही प्रतिष्ठा असते, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, एकनाथ शिंदे यांच्याशी आज सकाळीच फोनवरुन तासभर चर्चा झाली. झालेल्या चर्चेती माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचंही संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेंना पक्ष सोडणं सोपं नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणं सोप नाही, असंही ते म्हणाले. नाराजी दूर होईल, सर्व आमदार परत येतील. एकनाथ शिंदेंचं बंड शांत होईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच, आसाममध्ये सर्व आमदार सध्या पर्यटनासाठी गेले आहेत. आमदारांनी फिरायला हवं, नाराज कोणीच नाही. एकनाथ शिंदेंसोबत सतत संपर्कात आहोत. शिवसेनेचे नेतेही त्यांच्याशी संपर्क साधत आहेत, असंही राऊतांनी सांगितलं. इतर महत्त्वाच्या बातम्या Eknath Shinde : एकनाथ शिंदे गुजरातमध्ये....राजकीय भूकंप महाराष्ट्रात; शिंदेंचे बंड, शिवसेनेची बैठक...काय घडलं दिवसभरात?Eknath shinde : मला मंत्री केलं नाही तरी चालेल पण भाजपसोबत सत्ता स्थापन करा... एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाDevendra Fadanvis : ते पुन्हा येणार?... या पाच कारणांमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता   

Google Follow Image