Maharashtra Political Crisis: Exclusive : शिंदेंच्या गटात 'अब तक 46', शिवसेनेची गळती काही थांबेना; नवीन फोटो व्हायरल

Abp News | 2 days ago | 23-06-2022 | 10:51 am

Maharashtra Political Crisis: Exclusive : शिंदेंच्या गटात 'अब तक 46', शिवसेनेची गळती काही थांबेना; नवीन फोटो व्हायरल

Maharashtra Political Crisis Eknath Shinde : शिवसेनेच्या आमदारांचे बंड वणव्यासारखे पसरले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या 46 वर पोहचली आहे. रामटेकचे शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह चार आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. आज आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार आज शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. एकनाथ शिंदे आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. बुधवारी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरांना प्रत्यक्षात चर्चा करण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातली. त्यानंतरही शिवसेनेतील आमदारांची गळती कमी होताना दिसत नाही. आज एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झालेले आमदार हे मागील दोन दिवस शिवसेनेच्या बैठकीत सहभागी होते. त्यानंतर आज हे आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले. आमदार सदा सरवणकर यांच्यासोबत त्यांची कन्यादेखील गुवाहाटीत दाखल झाली आहे. आज दाखल झालेल्या शिवसेना आमदारांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. तर सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचे आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत. काल (22 जून) त्यांच्या गटात आणखी चार आमदार सहभागी झाले आहेत. गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकात पाटील आणि मंजुळा गावित हे शिंदे गटात सामील झाले. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का समजला आहे. इतर महत्त्वाच्या बातम्या:राज्यातील सत्ता पेच आणखी गडद, प्रियंका गांधी मुंबईत; विमानतळावरच काँग्रेस नेत्यांशी खलबतं 

Google Follow Image