Maharashtra Political Crisis : राज्यपाल कोश्यारी रुग्णालयात; गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा चार्ज?

Abp News | 6 days ago | 22-06-2022 | 10:12 am

Maharashtra Political Crisis : राज्यपाल कोश्यारी रुग्णालयात; गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा चार्ज?

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. अशातच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण झाली असून त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशातच पेचप्रसंगात अडचण होऊ नये म्हणून गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा चार्ज देण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. तसेच, लवकरच केंद्र सरकार यासंदर्भातील निर्णय घेऊ शकतं, अशीही माहिती समोर आली होती. पण असं काहीही होणार नसल्याचं स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आलं आहे. यासर्व घडामोडींवर राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्यपालांचा चार्ज दुसऱ्या कोणत्याही राज्याच्या राज्यपालांकडे दिला जाणार नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा चार्ज त्यांच्याकडेच राहील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच, राज्यपाल व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे उपलब्ध असतील अशी माहितीही राजभवनाकडून देण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर नवा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंदर्भात राज्यपालांना भेटून पुढील कारवाई ते करणार अशा चर्चा असतानाच आता ते कसं शक्य होणार हा प्रश्न आहे. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. उपचारासाठी ते मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाराज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना आज सकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

Google Follow Image