Maharashtra Political Crisis : सद्यस्थितीतील राजकीय घडमोडींवर एकनाथ खडसे म्हणतात...

Abp News | 6 days ago | 22-06-2022 | 03:44 pm

Maharashtra Political Crisis : सद्यस्थितीतील राजकीय घडमोडींवर एकनाथ खडसे म्हणतात...

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी झालेले आमदार एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींवर फारसं बोलणं टाळलं आहे. सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या या भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांचा विजय झाला. परंतु या विजयाचा आनंद साजरा करण्याची संधी महाविकास आघाडीला मिळाली नाही. विधानपरिषदेच्या निवडणूक निकालाच्या दिवशीच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. रात्रीतूनच ते समर्थक आमदारांसह सूरतमधील हॉटेलमध्ये दाखल झाले. आता शिवसेनेतून तब्बल 40 आमदार फुटल्याची सूत्रांची माहिती आहे.  विजयानंतर खडसे पहिल्यांदाच मतदारसंघातविधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर एकनाथ खडसे हे पहिल्यांदाच त्यांच्या जळगावातील मुक्ताईनगर इथल्या मतदारसंघात पोहोचले. त्यांच्या मुक्ताईनगर इथल्या निवासस्थानी स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांना सद्यस्थितीत राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर एकनाथ खडसे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर सविस्तर बोलणं टाळलं. सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या या भूमिकेत असल्याचं ते म्हणाले.विजयाचा आनंद, मात्र राजकीय घडामोडींमुळे चिंताएकनाथ खडसे यांच्या विजयाचा जल्लोष म्हणून त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात जय्यत तयारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींमुळे समर्थक तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तब्बल तीन वर्षानंतर खडसेंना आमदारकी मिळाली आहे, त्याचा मोठा आनंद कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र सद्यस्थितीत राजकीय घडामोडींमुळे चिंतेचं वातावरण सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये पसरलेलं आहे.विधानपरिषद निवडणुकीचा निकालभाजप : प्रवीण दरेकर (29 मते), श्रीकांत भारतीय (30 मते), राम शिंदे (30 मते), उमा खापरे (27 मते), प्रसाद लाड (28 मते)राष्ट्रवादी काँग्रेस : रामराजे नाईक निंबाळकर (29 मते ), एकनाथ खडसे (28 मते)शिवसेना : सचिन अहिर (26 मते), आमशा पाडवी (26 मते)काँग्रेस : भाई जगताप (26 मते), चंद्रकांत हंडोरे (पराभूत 22 मते)

Google Follow Image