Maharashtra Political Crisis : सुरतला जाण्यापेक्षा समोर या, 'कुऱ्हाड' होऊ नका, बंडवीर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्र्यांचं आव्हान  

Abp News | 6 days ago | 22-06-2022 | 06:18 pm

Maharashtra Political Crisis : सुरतला जाण्यापेक्षा समोर या, 'कुऱ्हाड' होऊ नका, बंडवीर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्र्यांचं आव्हान  

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदारांचा पाठिंबा आहे. या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलेय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना समोर येऊन बोलण्याचं आव्हान दिलेय.  माझ्या सहकाऱ्यांनी सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावं.... आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना दिले. बंडखोरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?मला आज दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसावेत, तर समजून घेतलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं....सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगावं.... तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको,,, असं तोंडावर सांगावं. माझ्या सहकाऱ्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावं.... आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो... जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबूरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत... तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन. ज्या शिवसैनिकांना वाटतंय की मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे.... ते सांगावं ,,, हेही पद सोडेन. मी मुख्यमंत्रीपदी असल्याने जर कुणाला अडचण असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडणार.... माझ्यानंतर जर कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे....गायब आमदारांनी माझं हे लाईव्ह पाहावं... आणि मला सांगावं... मी पद सोडेन,,,,, तोंडावर सांगाव. मी ज्यांना माझे मानतो, त्यापैकी कितीजण तिकडे गेले..... त्यापैकी एकानेही माझ्याविरोधात मत केलं तर ते माझ्यासाठी लाजीरवाणे असेल. त्यामुळे त्यांच्यापैकी एकानेही सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या, मी तयार आहे. एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा. 

Google Follow Image