maharashtra politics : पक्के मित्र राजकीय वैरी कसे झाले? राणे-केसरकर यांच्यातील वाद नेमका काय? 

Abp News | 6 days ago | 05-08-2022 | 07:43 pm

maharashtra politics : पक्के मित्र राजकीय वैरी कसे झाले? राणे-केसरकर यांच्यातील वाद नेमका काय? 

Deepak kesarkar vs Narayan Rane : एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत गेला. पण नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील राजकीय वैर काही संपलेले नाहीये. आपल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी राणेंना लक्ष्य केल्याचं वारंवार दिसून आलं. त्याला निलेश राणे यांच्याकडून देखील उत्तर दिलं गेलं. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राणे आणि केसरकर यांच्यातला वाद नेमका आहे तरी काय? केसरकर आणि राणे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर कोकणातलं राजकारण नेमक्या कोणत्या दिशेने जाणार?  दीपक केसरकर विरुद्ध नारायण राणे हे राजकीय द्वंद सध्या आपल्याला रंगलेलं दिसून येतंय... कोकणातील एका जिल्ह्यातील अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे नेते. कधी काळी मैत्री असलेले हे नेते. पण सध्या मात्र पक्के राजकीय वैरी अशीच या दोघांची अवस्था झाली आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र आले.. अगदी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे हे देखील एकत्र आले. पण दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यातलं राजकीय वैर संपण्याचा काही नाव घेत नाहीये. कधीकाळी मित्र असलेले हे दोघेही आज पक्के राजकीय वैरी का आहेत? हाच प्रश्न सध्या सर्वांना पडलाय?केसरकर आणि राणे यांच्या वादाची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी देखील शिवसेनेत असताना दीपक केसरकर यांनी राजकीय दहशतवाद असं म्हणत कायमच राणे यांना लक्ष केलेलं आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र आहेत. पण त्यानंतर देखील हा वाद काही क्षमण्याचं नाव घेत नाहीये. अगदी नारायण राणे यांची ज्येष्ठ पुत्र आणि माझी खासदार निलेश राणे त्यांनी देखील दीपक केसरकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. शिवसेना विरुद्ध राणे हा तळ कोकणातला वाद कायम राहणार आहे. पण त्याच वेळेला आता केसरकर विरुद्ध राणे  नवा वाद  आणखीन तीव्रतेने समोर येताना दिसून येतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचे राजकीय परिणाम नक्की दिसून येणार आहेत. त्यामुळे आता केसरकर आणि राणे हा वाद नेमका कोणत्या दिशेला जातो हे पाहावे लागणार आहे.राणे आणि केसरकर यांच्यातील राजकीय वाद काय?सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदावर असल्यापासूनच दीपक केसरकर आणि राणे यांच राजकीय वैर होत. 2009 मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहिले. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्या समेट घडून नारायण राणेंना दीपक केसरकर यांना मदत करण्यास सांगितल्यामुळेच दीपक केसरकर 2009 मध्ये सावंतवाडी मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले. दीपक केसरकर पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राणे आणि केसरकर यांचं सख्ख्य नव्हतं. त्यामुळेच नेहमी राणेंच्या विरोधात बोलणारे दीपक केसरकर 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेत गेले आणि त्यानंतर 2014 पासून आतापर्यंत दीपक केसरकर यांनी नेहमी नारायण राणे आणि कुटुंबीयांनी जिल्ह्यात दहशतवाद केल्याचा आरोप करत राहिले.2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा प्रचार करावा लागणार म्हणूनच विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दीपक केसरकर यांनी शिवसेनेत उडी मारली. याच कारण म्हणजे राणेंनी 2009 मध्ये दीपक केसरकर यांना मदत केली होती. त्यामुळे आधीच  राणे आणि शिवसेना यांचं राजकीय वैर होताच. त्यात दीपक केसरकर 2014 मध्ये शिवसेनेत गेल्यानंतर राणेच्या विरोधात बोलण्यास केसरकराना खुल मैदान मिळालं. त्यामुळे 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दीपक केसरकर नेहमी राणेंच्या विरोधात बोलत असताना दहशतवाद या मुद्द्यावर बोलत राहिले. दीपक केसरकर 2014 मध्ये शिवसेनेत गेल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात शिवसेनेच्या वतीने दीपक केसरकर यांनी नेहमी राणेंनी दहशतवाद निर्माण केल्याचा मुद्दा प्रचारात आणला. याचाच फटका नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीत बसला आणि राणेंचा पराभव झाला. हाच पराभव नारायण राणे यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आजही जिल्ह्यात कुठेही जाहीर व्यासपीठावर राजकीय भाषण करताना 2014 च्या पराभवाचा छल्य बोलून दाखवत असतात. हेच कारण आहे की राणे आणि केसरकर यांचं राजकीय वाद आहेत.

Google Follow Image