Mahesh Babu: वडिलांच्या निधनानंतर महेश बाबूची अत्यंत भावूक पोस्ट; 'याआधी मला कधीच असं..'

Tv 9 | 1 week ago | 25-11-2022 | 08:05 am

Mahesh Babu: वडिलांच्या निधनानंतर महेश बाबूची अत्यंत भावूक पोस्ट; 'याआधी मला कधीच असं..'

हैदराबाद: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आणि अभिनेते महेश बाबू यांचे वडील कृष्णा यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. 15 नोव्हेंबर रोजी हैदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनानंतर आता महेश बाबूने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘तुमचा वारसा मी पुढे नेईन’ अशा शब्दांत महेशने भावना व्यक्त केल्या आहेत.‘तुमचं आयुष्य जेवढं साजरं झालं, त्याहीपेक्षा जास्त तुमचं जाणं साजरं केलं गेलं. हीच तुमची महानता आहे. तुम्ही निर्भयपणे आयुष्य जगलात. धाडसी आणि धडाडी हा तुमचा स्वभाव होता. माझी प्रेरणा.. माझं धैर्य.. आणि मी ज्या गोष्टीकडे सतत पाहत आलोय, जे खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं ते एका झटक्यात असं निघून गेलंय. पण विशेष म्हणजे मला माझ्यात आता ही ताकद जाणवते जी मला आधी कधीच जाणवली नव्हती. आता मी निर्भय झालोय. तुमचा प्रकाश सदैव माझ्यात चमकत राहील. मी तुमचा वारसा पुढे नेईन. तुम्हाला माझा आणखी अभिमान वाटेल. लव्ह यू नान्ना.. माझे सुपरस्टार’, अशी पोस्ट महेश बाबूने लिहिली.  A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)महेश बाबूसाठी 2022 हे वर्ष एखाद्या वाईट स्वप्नासारखंच आहे. या वर्षात त्याने आतापर्यंत कुटुंबातील तीन सदस्यांना गमावलं आहे. आधी मोठा भाऊ, त्यानंतर आई आणि आता महेश बाबूच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. जवळच्या व्यक्तीच्या निधनाचं दु:ख पचवणं खूप कठीण असतं. त्यातच हा धक्का वारंवार मिळाल्यास भावनिकदृष्ट्या माणूस खचतो. महेश बाबू आणि त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याने चाहतेसुद्धा शोक व्यक्त करत आहेत.

Google Follow Image