Nashik Crime : 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत दोन मुलींची सुटका, आठ संशयितांना अटक 

Abp News | 6 days ago | 05-08-2022 | 05:09 pm

Nashik Crime : 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत दोन मुलींची सुटका, आठ संशयितांना अटक 

Nashik Crime : नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) ऑपरेशन मुस्कान अंतर्गत मोठ्या शिताफीने ओझर (Ozar) येथील दोन्ही मुलींची सुटका केली. या प्रकरणी आतापर्यंत आठ संशयितांना अटक करण्यात आली असून या प्रकरणातून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधिक्षक सचिन पाटील (SP Sachin Patil) व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या (Nashik) ओझर येथून एक चौदा वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दाखल केली होती. नाशिक पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. यानुसार एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत माहीती घेतली असता शहर परिसरात अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत महाराष्ट्र- मध्यप्रदेश-गुजरात- मध्यप्रदेश असा तपास करत शेवटी संबंधित मुलीचा विवाह सुरु असताना पोलीस घटनास्थळी पोहचले. यावेळी गावकऱ्यांनी पोलिसांना दमदाटी केली, मात्र पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी ओझर येथून एक महिला धुळ्याहून दोन महिला तर मध्यप्रदेशातील दोघांना पोलिसांनी अटक केली. ओझर येथील महिलेने संबधित मुलीला पावणे दोन लाख रुपयांत विकल्याचे माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान ऑपरेशन मुस्कान (Operation Muskan) अंतर्गत हि मोहीम पार पडली असताना ओझर येथून अपहरण झालेल्या दुसऱ्या मुलीचा देखील शोध लागला आहे. मध्यप्रदेशातील (Madhyapradesh) भगवान पुरा येथून ताब्यात घेण्यात आले. गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये गेलेल्या नाशिक पोलीस पथकाने हि कामगिरी बजावली. या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान ओझरमधीलच एक महिला पैशांसाठी हे काम करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या महिलेस ताब्यात घेण्यात आले असून आतापर्यंत मूळ गुन्हयात पाच तर दुसऱ्या गुन्ह्यात तीन अशा एकूण आठ संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आठ जणांना अटक ओझर अपहरण प्रकरणानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबविले. त्या माध्यमातून दोन मुलींची सुटका करण्यात आली. याशिवाय यामध्ये असलेल्या आठ संशयितांना अटक करण्यात आली. हि संघटित टोळी असून अपहरणाचे काम केले जाते, जिथून मुली शोधल्या जातात, जिथे विकल्या जातात. दरम्यान पोलिसांचे अद्यापही तपास करत असून संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. 

Google Follow Image