Abp News | 4 days ago | 06-08-2022 | 09:42 pm
Pune News Update : पुण्याच्या (Pune) मावळ (Maval) तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. पीडितेच्या कुटुंबाची आज विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी निर्भया आणि कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. अजित पवार म्हणाले, "विरोधी पक्षनेता म्हणून मला इथं यावं लागलं हे माझं दुर्देव समजतो. निर्भयाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंब हतबल झालय. निर्भया आणि संशयित आरोपी दोघेही एकाच गावातील असल्यामुळे गावकरी चिंतेत आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. कोवळ्या वयात निर्भयावर जे अत्याचार झाले हे खरच वाईट घटना आहे. या घटनेचा निषेध करतो. येणाऱ्या अधिवेशनात संपूर्ण सभागृहाच्या वतीने हा मुद्दा मांडेन. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवण्यासाठी प्रयत्न करेन. नराधमाला फाशी देण्यासाठी प्रयत्न करेनअजित पवार म्हणाले, या प्रकरणी वकील देऊ आणि नराधमाला मरेपर्यंत फाशी होईल यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे प्रयत्न करेन. आर्थिक मदतीने निर्भया परत येणार नाही, मात्र कुटुंबाला हातभार लावायला हवा. अशी घटना भविष्यात घडू नये म्हणून कठोरात कठोर शासन करायला हवं. नंतर कोणी अशी हिंमत करता कामा नये." "माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. कसं काय लोक असे धाडस करतात, हे मनाला पटतच नाही. मी जास्त काही बोलत नाही. पण तुम्हाला पुढं बऱ्याच गोष्टी कारवाईतून घडताना दिसतील. या नराधमाणे याआधी ही असं धाडस केलं होतं. तेंव्हा तुम्ही ग्रामस्थांनी ही बाब गुपित ठेवायला नको होती. तेंव्हाच या नराधमाला आपण ठेचले असते तर कदाचित ही घटना पुढं घडली नसती. आता तर ग्रामस्थांनी जागृत रहायला हवं, असे अजित पवार म्हणाले. महत्वाच्या बातम्या