Patra Chawl Case : ईडी कार्यालयात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी

Abp News | 5 days ago | 06-08-2022 | 12:03 pm

Patra Chawl Case : ईडी कार्यालयात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी

Patra Chawl Case : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांची समोरासमोर चौकशी सुरु आहे. मुंबईतील ईडी (ED) कार्यालयात या दोघांची चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीला संजय राऊत यांच्या घरातून काही कागदपत्रे मिळाले होते. त्यासंदर्भात प्रश्न विचारले जाणार आहेत. तर वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात एक कोटी आठ लाख रुपये जमा झाले होते, त्याबाबत विचारणा केली जाणार आहे. पत्राचाळ घोटाळ्यात (Patra Chawl Case) ईडीने संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली जात आहे. ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावून आज (6 ऑगस्ट) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार वर्षा राऊत आज सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्यांच्यासोबत मुलगी, जावई आणि संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत देखील होते. वर्षा राऊत यांच्या ईडी चौकशीत आज त्यांच्या बँक खात्यातील व्यवहार आणि जमीन व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे.वर्षा राऊत यांची यापूर्वीही चौकशीपत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावलं आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती. आता पुन्हा एकदा ईडीनं वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.  वर्षा राऊत यांच्या नावे अलिबागमध्ये संपत्ती; कधी आणि कितीला खरेदी केली जमीन? दरम्यान वर्षा राऊत यांच्या नावावर खरेदी केलेल्या अलिबागमधील मालमत्तेची माहिती एबीपी न्यूजला मिळाली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि इतरांच्या नावे 10 ठिकाणी एकूण 36.86 चौरस मीटर जमीन खरेदी करण्यात आली आहे.पहिली जमीन खरेदीजमीन खरेदी केल्याची तारीख - मार्च 2012विक्रेत्याचे नाव - अविनाश देशपांडे आणि दीपाली देशपांडेखरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना पाटकरजमीन किती किमतीला विकत घेतली - सात लाख रुपयेदुसरी जमीन खरेदीजमीन खरेदी केल्याची तारीख - 03-05-2010विक्रेत्याचे नाव - गिरीश शुक्ला आणि सुलोचना शुक्लाखरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकरजमीन किती किमतीला विकत घेतली - सहा लाख तीस हजारतिसरी आणि चौथी मालमत्ता खरेदीजमीन खरेदी केल्याची तारीख - 03 मे 2010विक्रेत्याचे नाव - दिलीप खळेखरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकरजमीन किती किमतीला विकत घेतली - तेरा लाख ऐंशी हजारपाचवी जमीन खरेदीजमीन खरेदी केल्याची तारीख - 01 जून 2011विक्रेत्याचे नाव - श्रीधर आंदेकरखरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकरजमीन किती किमतीला विकत घेतली - सात लाख रुपयेसहावी जमीन खरेदीजमीन खरेदी केल्याची तारीख - 16 मार्च 2012विक्रेत्याचे नाव- अविनाश देशपांडे आणि दीपाली देशपांडेखरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकरजमीन किती किमतीला विकत घेतली - दहा लाख रुपयेसातवी आणि आठवी जमीन खरेदीजमीन खरेदी केल्याची तारीख - 06 फेब्रुवारी 2010वाचलेल्या व्यक्तीचे नाव- अभय मालप, कल्पना मालप, संजना मालप आणि अंकिता मालपखरेदीदाराचे नाव - वर्षा संजय राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकरजमीन किती किमतीला विकत घेतली - आठ लाख 9 हजार महत्त्वाच्या इतर बातम्या : Patra Chawl Land Scam: काय आहे पत्राचाळ घोटाळा?Patra Chawl Scam : संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

Google Follow Image