Politics: अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात 'भाजप' पदाधिकाऱ्यांची घालमेल; भाजपमध्ये आल्यास...

Abp News | 4 days ago | 23-06-2022 | 12:00 pm

Politics: अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात 'भाजप' पदाधिकाऱ्यांची घालमेल; भाजपमध्ये आल्यास...

Maharashtra politics: एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केलेल्या बंडानंतर आलेल्या राजकीय भूकंपाचे धक्के आता स्थानिक पातळीवरील सुद्धा बसू लगले आहे. गावातील कार्यकर्त्यांपासून तर दिल्लीतील लोकसभेत बसणाऱ्या नेत्यावर सुद्धा याचे परीणाम दिसत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरु असताना सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार (abdul sattar) यांना सतत विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांची गोची होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी सत्तार कॉंग्रेसमध्ये होते. सत्तार यांच्या राजकीय एन्ट्रीपासून तर आतापर्यंत त्यांचे कट्टर विरोधक म्हणून भाजपच्या स्थानिक पदाधिकारी भूमिका बजावत आले आहे. त्यात विधानसभा निवडणूकी दरम्यान सत्तार यांनी कॉंग्रेसची साथ सोडली. त्यांनतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. फडणवीस सुद्धा यासाठी सकारात्मक होते. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी सत्तार यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला. त्यामुळे सत्तार यांचा प्रवेश होऊ शकला नाही आणि त्यांना शिवबंधन बांधावे लागले. आता पुन्हा बंडखोर गट भाजपमध्ये आल्यास काय होणार? अशी चिंता सत्तारांच्या मतदारसंघातील 'भाजप' पदाधिकाऱ्यांना लागली आहे. सत्तार भाजपमध्ये आले तर?सुरुवातीपासून राजकीय विरोधक म्हणून सिल्लोड तालुक्यात भाजपने सत्तार यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. आता सत्तारांच्या राजकीय बंडामुळे त्यांची भाजपप्रवेशाची वाट सुकर झाल्यास भाजप कार्यकर्त्यांवर असलेली परिस्थिती नेत्यांवर येणार. त्यामुळे सिल्लोडमध्ये भाजपचा मोठा विरोधक असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार भाजपमध्ये आले तर काय होणार याचीच तालुक्यात चर्चा सुरु आहे.Exclusive : शिंदेंच्या गटात 'अब तक 46', शिवसेनेची गळती काही थांबेना; नवीन फोटो व्हायरलमतदारसंघात थांबण्याचे आदेश... राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात राष्ट्रवादी,कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या शिवसेना आमदारांना मुंबईत बोलवण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे भाजप आमदारांना  मतदारसंघातच थांबण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आला आहे. सोबतच राज्य न सोडण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीला तरी भाजपचे आमदार शिवसेनेतील बंडाचा आनंद घेतांना दिसत आहे.    

Google Follow Image