Pooja Gehlot Wins bronze : महिला कुस्तीपटू पुजाने जिंकलं कांस्यपदक, स्कॉटलंडच्या क्रिस्टीलला मात देत मिळवला मान

Abp News | 1 week ago | 06-08-2022 | 09:57 pm

Pooja Gehlot Wins bronze : महिला कुस्तीपटू पुजाने जिंकलं कांस्यपदक, स्कॉटलंडच्या क्रिस्टीलला मात देत मिळवला मान

Wrestling in Commonwealth 2022 : इंग्लंडच्या बर्मिगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताच्या कुस्तीपटूंनी शुक्रवारी एकाच दिवसात सहा पदकं खिशात घातल्यानंतर आजही दमदार कामगिरी करत आहेत. दिग्गज कुस्तीपटूंनी फायनल गाठत पदक निश्चित केलं असताना महिलांच्या 50 किलो वजनी गटात पुजा गेहलोटने कांस्य पदक मिळवलं आहे. तिने स्कॉटलंडच्या क्रिस्टील लेमोफॅक लेचिडजिओला मात देत ही कामगिरी केली आहे. पुजा आणि क्रिस्टील यांच्यातील सामन्यात सुरुवातीपासूनच पुजाने आपला दबदबा कायम ठेवला होता. तिने क्रिस्टीलला अधिक डाव खेळूच दिले नाहीत. तसंच स्वत: खेळलेले डाव इतके दमदार होते की क्रिस्टीलला त्याचा सामना करता आला नाही. ज्यामुळे अखेर सामना पुजाने 12-2 च्या फरकाने जिंकत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.POOJA WINS BRONZE 🥉U-23 World Championships Silver Medalist and debutant #PoojaGehlot 🤼‍♀️ (W-50kg) bags 🥉after defeating Scotland's Letchidjo by technical superiority (12-2) 🔥Amazing Gutwrench by Pooja to take the 8 points lead 👏 Complete dominance 💪#Cheer4India pic.twitter.com/N7Z7CkFZVdभारताचं कुस्तीतील सातवं पदक भारताचे कुस्तीपटू कॉमनवेल्थमध्ये अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहे. अंशूने रौैप्य तर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने सुवर्णपदक मिळवल्यानंतर कुस्तीपटू दीपक पुनियानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये पराभूत दिव्या काकरनने कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर मोहित ग्रेवालने कांस्यपदक मिळवल्यानंतर आता पुजानेही कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.हे देखील वाचा-CWG 2022 : बॉक्सर जॅस्मीन सेमीफायनलमध्ये पराभूत, कांस्य पदकावर मानावं लागलं समाधान, अमित-नीतू मात्र फायनलमध्ये 

Google Follow Image