Pune Crime News: गाडीचा धक्का लागला अन् सपासप वार करत केली 23 वर्षीय तरुणाची हत्या; 5 जणांना अटक

Abp News | 5 days ago | 05-08-2022 | 07:12 pm

Pune Crime News: गाडीचा धक्का लागला अन् सपासप वार करत केली 23 वर्षीय तरुणाची हत्या; 5 जणांना अटक

Pune Crime News: पुण्यातील कोंढवा येथे एका 23 वर्षीय तरुणाची नागरीकांसमोरच वार करून हत्या करण्यात आली. कोंढवा येथील शिवनेरी नगर येथील महेश गुजर असे मृताचे नाव आहे. ही भीषण हत्या घडल्याने परिसरातील दुकानदारांनी शटर बंद करून ते परिसर सोडून पसार झाले. पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे.पीडित व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तरीही त्यांनी त्याला मदत करण्यास, रुग्णालयात नेण्यास किंवा पोलिसांना कॉल करण्यास अनेकांनी नकार दिला होता. त्याची बहीण सोनी गुजर हिने कोंढवा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी राजेश पवार, कृष्णा मराठे, सचिन राठोड, अमर गव्हाणे, गणेश हाके यांना ताब्यात घेतले.पाच संशयितांनी गुजरचा नेमका बदला घेण्यासाठी गुन्हेगारी कटाचा एक भाग म्हणून त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. गुन्हा घडल्यानंतर काही वेळातच आरोपी शहरातून पळून गेले, मात्र कोंढवा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत त्यांना शोधून काढले आणि पाच जणांना अटक केली.भगवा चौकातून गाडी चालवत असताना आरोपीच्या कारला धडक दिली. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले आणि त्यांनी गुजर यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. 1 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. त्यामुळे महेश गुजर घाबरलेल्या अवस्थेत घरी गेला होता. आरोपींनी 2 ऑगस्ट रोजी गुजर आणि त्याच्या मित्राला पुन्हा धमकी दिली. काही वेळातच त्याची हत्या केली.यापुर्वी  पुण्याच्या बावधन परिसरात पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पीतबसा कमलचंद जानी असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव होतं. याप्रकरणी प्रदीप बलभीम राजोळे, आकाश कांबळे, आकाश पवार यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारच्या रात्री आठच्या सुमारास पीतबसा यांच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्यांच्या डोक्यात, हातावर वार करण्यात आले होते.

Google Follow Image

Latest NewsMAHARASHTRA WEATHERMAHARASHTRA WEATHER