Pune FTII Suicide: पुण्यात FTII मध्ये गळफास घेत विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

Abp News | 1 week ago | 05-08-2022 | 12:39 pm

Pune FTII Suicide: पुण्यात FTII मध्ये गळफास घेत विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

Pune FTII Suicide:  पुण्यातील (Pune) एफटीआयआय (film and television institute of india)  मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने फाशी घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. अश्विन शुक्ला असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.  सकाळी  9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला होता. आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर असणाऱ्या फिल्म टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर डेक्कन पोलीस स्टेशनचे मार्शल घटनास्थळी दाखल झाले. अश्विन शुक्ला असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो एफटीआयआय मधील बॉईज हॉस्टेलमध्ये राहत होता. आज सकाळी नऊ वाजता त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. अश्विन शुक्ला हा मुळचा गोवा येथील रहिवासी आहे. एफटीआयआयमध्ये तो शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील प्रक्रिया सुरू आहे.  

Google Follow Image