Pune Gram Panchayat Election Results 2022 :पुण्यातील 19 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी 

Abp News | 6 days ago | 05-08-2022 | 06:39 pm

Pune Gram Panchayat Election Results 2022 :पुण्यातील 19 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी 

Pune Gram Panchayat Election Results 2022 : पुणे जिल्ह्यातील 19 ग्राम पंचायतींसाठी पहिल्या टप्प्यात 4 ऑगस्टला मतदान झाले होते त्याचा आज निकाल जाहीर झाला आहे. दुसर्‍या टप्प्यात 284 ग्राम पंचायतींसाठी मतदान होणार आहे. जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या या 284 ग्रामपंचायती आहेत. जिल्यातील 19 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. एकूण 19 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. त्यात मालखेड, खानापूर, लोणीकंद, खामगाव, टिळेकरवाडी, तांदळी, जांबुत, शरडवाडी, टाकळी हाजी, म्हसे बु, माळवाडी, जळगाव कडे पठार, भिलारेवाडी,  जंक्शन, आनंद नगर, आनंद नगर, वरकुटे, बहिरवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.हवेली हवेली तालुक्यातील मालखेड ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पक्षाने  विजय मिळवला आहे. खानापूर ग्रामपंचायतीत  राष्ट्रवादी पक्षाने ने 06-05 ने विजय मिळवला आहे. लोणीकंद मध्ये भाजप विजयी झाले आहे. खामगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. टिळेकरवाडीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.शिरुरशिरुर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवड्णुकीचा निकाल आज जाहीर झाला . ग्रामपंचायतीच्या या विजयी उमेदवारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे .बारामतीबारामती तालुक्यातील जळगाव कडे पठार ग्रामपंचायतीत सत्ता राष्ट्रवादीकडे गेली आहे. भिलारेवाडीमध्येही राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे.इंदापूर इंदापूर तालुक्यातीत चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यात जंक्शनमध्ये एकूण 8 जागा होत्या त्यात पाच जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत तर भाजपने 3जागा जागेवर विजय मिळवला आहे. आनंद नगर भाजपकडे सत्ता आली आहे. करेवाडीतील सातही जागेवर राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे. वरकुटेमध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे.पुरंदरपुरंदर तालुक्यातील बहिरवाडी आणि सिंगापूर ग्रामपंचायतील शिवसेनेच्या शिंदे गटाने बाजी मारली आहे.19 ग्रामपंचायत निकाल जाहीर राष्ट्रवादी-9 भाजप - 3शिवसेना -2 ( शिंदे गट)स्थानिक आघाडी- 4महाविकास आघाडी- 1

Google Follow Image