Rahul Dravid: T20 मध्ये द्रविड यांच्याजागी नेहराला टीम इंडियाचा हेड कोच बनवण्यामध्ये काय फायदे? समजून घ्या 4 पॉइंटसमधून

Tv 9 | 1 week ago | 24-11-2022 | 05:05 pm

Rahul Dravid: T20 मध्ये द्रविड यांच्याजागी नेहराला टीम इंडियाचा हेड कोच बनवण्यामध्ये काय फायदे? समजून घ्या 4 पॉइंटसमधून

मुंबई: आधी आशिया कप त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप दोन्ही टुर्नामेंट्समध्ये टीम इंडियाने अपेक्षित कामगिरी केली नाही. टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता हेड कोच राहुल द्रविड यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय.हरभजनच मत काय?माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंहने असं म्हटलय की, राहुल द्रविड यांच्यासोबत टी 20 फॉर्मेटचा अनुभव असलेली एक व्यक्ती कोचिंग स्टाफमध्ये असली पाहिजे. ज्यांना या फॉर्मेटची बऱ्यापैकी समज आहे. हरभजन सिंहने यावेळी आशिष नेहराच नाव घेतलं होतं.नेहरा आयडीयल कोच का ठरु शकतो?आशिष नेहराच नाव यासाठी समोर आलय, कारण आयपीएल 2022 मध्ये त्याने आपलं कोचिंग कौशल्य दाखवून दिलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टायटन्स सारख्या नवख्या टीमने पहिल्याच प्रयत्नात आयपीएलच विजेतेपद मिळवलं.आता प्रश्न हा आहे की, आशिष नेहरा टी 20 मध्ये राहुल द्रविड यांच्यापेक्षा उत्तम कोच ठरु शकतो का?. आशिष नेहरा यांच्यामध्ये 4 वैशिष्ट्य आहेत, ज्यामुळे तो आयडीयल कोच ठरु शकतात.1. टी20 सामन्यांचा चांगला अनुभवआशिष नेहरा काही वर्षापूर्वीच रिटायर झाला आहे. त्याला टी 20 फॉर्मेटची चांगली समज आहे. हरभजनच्या बोलण्यात पॉइंट आहे. कारण नेहराकडे 88 आयपीएल मॅचेसचा अनुभव आहे. त्याशिवाय तो स्वत: 28 टी 20 सामने खेळलाय.2. टीम मॅनेजमेंटमध्ये हुशारआशिष नेहराच आणखी एक वैशिष्टय म्हणजे तो टीम मॅनेजमेंटमध्ये हुशार आहे. खेळाडूंसोबत मैत्रीपूर्ण संबंध हा त्याचा एका प्लस पॉइंट आहे. त्यामुळे खेळाडू नर्वस नसतात. मैदानावर ते चांगली कामगिरी करतात. गुजरात टायटन्ससाठी सुद्धा नेहराने हेच केलं. नेहराने अनेक युवा खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये संधी दिली. यात साई किशोर, साहा, वेड, राहुल तेवतिया सारखे खेळाडू होते.3 आकड्यांना अजिबात महत्त्व देत नाहीआशिष नेहराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, तो आकडे आणि मॅच अप्ससारख्या गोष्टींना फार महत्त्व देत नाही. एखादा प्लेयर चांगला आहे, तर तो कुठल्याही परिस्थितीत आणि प्रतिस्पर्ध्या विरुद्ध चांगली कामगिरी करु शकतो. आकड्यांपेक्षा तो खेळाडूचा फॉर्म आणि क्षमतेला जास्त प्राधान्य देतो.4 हार्दिक पंड्या बरोबर चांगलं ट्यूनिंग2024 टी 20 वर्ल्ड कपच्यावेळी हार्दिक पंड्या कॅप्टन असू शकतो. अलीकडेच पंड्याने न्यूझीलंडमध्ये टीमला टी 20 मालिकेत विजय मिळवून दिला. पंड्या कॅप्टन असेल, तर नेहराची त्याच्यासोबत चांगली ट्यूनिंग जमू शकते. आयपीएल 2022 मध्ये दोघांनी मिळून गुजरात टायटन्स सारख्या नवख्या टीमला चॅम्पियन बनवलं.

Google Follow Image