Rahul Gandhi Detained : राहुल गांधीसह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन

Abp News | 6 days ago | 05-08-2022 | 12:39 pm

Rahul Gandhi Detained : राहुल गांधीसह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन

Rahul Gandhi Detained : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ताब्यात घेतलं आहे. महागाई (Inflation), बेरोजगारीविरोधात (UnEmployment) काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. देशभरात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं आक्रमक पवित्राल घेतला आहे. दिल्ली, मुंबई, नागपूरसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात येत आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा निघणार होता. पण दिल्ली पोलिसांना काँग्रेसचा हा मोर्चा रोखला आणि आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. मुंबईतही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मुंबईत पोलिसांनी नाना पटोले यांना ताब्यात घेतलं. याशिवाय पुण्यातही काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यात आली. दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काळे कपडे परिधान करत महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहभाग घेतलाय.काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील केंद्र सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्वाचे मुद्दे

Google Follow Image