रामदेव बाबा यांचं महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान; संतप्त रुपाली ठोंबरे म्हणाल्या, अमृताताईंनी सणकन कानाखाली...

Tv 9 | 1 week ago | 25-11-2022 | 05:05 pm

रामदेव बाबा यांचं महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान; संतप्त रुपाली ठोंबरे म्हणाल्या, अमृताताईंनी सणकन कानाखाली...

पुणे: महिला साडी आणि सलवारमध्ये चांगल्या दिसतात. त्यांनी काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात, असं आक्षेपार्ह विधान योग गुरू रामदेव बाबा यांनी केलं आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे प्रचंड संतापल्या आहेत. रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.महिलांनी काय घालायाचं काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. हे विधान अमृता फडणवीस यांच्या समोर झालं आहे. अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती, अशी संतप्त प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे यांनी दिली आहे.महिलांनी साडी, सलवार घालणे इथपर्यंत ठिक आहे. ते मान्य आहे. पण पुढचं विधान कितपत योग्य आहे? रामदेव बाबा डोकं खाली आणि पाय वर करा. तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही. त्यांचं हे विधान घाणेरडं आहे. या विधानाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. त्यामुळेच रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळं फसणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.गृहखात्याने बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करतानाच भाजपशी संबंधित लोक महिलांचा वारंवार अपमान करतात, असंही त्या म्हणाल्या.दरम्यान, ठाण्यातील हायलँड मैदानात योग गुरु रामदेव बाबा यांनी आज योगासन करत योगाचे धडे दिले. यावेळी ठाणेकरांनी योगासनाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. तसेच मंचावर आमदार रवी राणा आणि दिपाली सय्यद देखील योगा करताना पाहायला मिळाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या.यावेळी योगासन करण्यासाठी आलेल्यांना मार्गदर्शन करताना रामदेव बाबांची जीभ घसरली. साड्या नेसायला नाही मिळाल्या, काही समस्या नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. महिला साड्या नेसून पण चांगल्या दिसतात. महिला ड्रेस (सलवार सूट) मध्ये सुद्धा चांगल्या दिसतात. आणि माझ्या नजरेने महिलांनी काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं रामदेव बाबा म्हणाले. त्यामुळे वादंग निर्माण झाला आहे.

Google Follow Image