Ravi Dahiya Wins GOLD : कुस्तीपटू रवी दहियानं मारलं मैदान, सुवर्णपदकाला गवसणी, भारताच्या खिशात दहावं GOLD

Abp News | 4 days ago | 06-08-2022 | 10:13 pm

Ravi Dahiya Wins GOLD : कुस्तीपटू रवी दहियानं मारलं मैदान, सुवर्णपदकाला गवसणी, भारताच्या खिशात दहावं GOLD

Wrestling in Commonwealth 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचे कुस्तीपटू कमाल फॉर्ममध्ये दिसत आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात सहा पदकं खिशात घातल्यानंतर आजही भारताचे कुस्तीपटू मैदान मारताना दिसत आहेत. नुकताच ऑलिम्पिक पदक विजेत्या रवी दहियाने 57 किलो वजनी गटात नायजेरियाच्या Ebikewenimo Welson याला मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताचं स्पर्धेतील हे दहावं सुवर्णपदक आहे.  RAVI WINS G🔥LD 😍3 time Asian Champion & #Tokyo2020 Olympics 🥈 medalist 🤼‍♂️ @ravidahiya60 (M-57kg) has now conquered the #CommonwealthGames, winning GOLD 🥇on his debut 🤩Brilliant Gutwrench & winning by technical superiority, that's stoic & determined RAVI for you 😇 1/1 pic.twitter.com/UhLFq7c8od भारताचं कुस्तीतील आठवं पदक भारताचे कुस्तीपटू कॉमनवेल्थमध्ये अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहे. अंशूने रौैप्य तर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने सुवर्णपदक मिळवल्यानंतर कुस्तीपटू दीपक पुनियानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये पराभूत दिव्या काकरनने कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर मोहित ग्रेवालने कांस्यपदक मिळवल्यानंतर पुजानेही कांस्यपदकाला गवसणी घातली ज्यानंतर काही वेळातच रवी दहियाने सुवर्णपदक जिंकलं आहे. हे देखील वाचा-CWG 2022 : बॉक्सर जॅस्मीन सेमीफायनलमध्ये पराभूत, कांस्य पदकावर मानावं लागलं समाधान, अमित-नीतू मात्र फायनलमध्ये

Google Follow Image

Latest NewsMAHARASHTRA WEATHERMAHARASHTRA WEATHER