Repo Rate Hike Impact on EMI : रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ; जाणून घ्या तुमच्या गृह कर्जाचा EMI किती वाढणार?

Abp News | 5 days ago | 05-08-2022 | 12:12 pm

Repo Rate Hike Impact on EMI : रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ; जाणून घ्या तुमच्या गृह कर्जाचा EMI किती वाढणार?

Repo Rate Hike Impact on EMI : रिझर्व्ह बँकेने नवीन पतधोरण जाहीर करताना पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर आता बँकांकडूनही कर्जे महाग होण्याची दाट शक्यता आहे. याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर मोठ्या प्रमाणावर होणार असून गृह कर्ज महागणार आहे. कर्जांसह तुमच्या ईएमआयमध्येही वाढ होणार आहे. तुमचा ईएमआय नेमका किती वाढणार, हे जाणून घेऊयात. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर वाढीचा तात्काळ परिणाम बँकेच्या बाह्य बेंचमार्कशी जोडलेल्या गृहकर्जांसारख्या किरकोळ कर्जांवर होतो. बहुतेक बँकांनी त्यांचे कर्ज दर आरबीआय रेपो दराशी जोडले (RLLR)आहेत आणि त्यामुळे कर्जदारांना त्याचा तात्काळ परिणाम जाणवतो.किती वाढणार तुमचा ईएमआय?रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीचा परिणाम किती होतो, हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहुयात.  तुम्ही 30 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षांसाठी 7.5 टक्के (अंदाजित) या दराने घेतले आहे. तर, तुम्हाला या कर्जासाठी 24 हजार 168 रुपये प्रति महिना इतका ईएमआय भरावा लागत आहे.रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीच्या निर्णयानंतर बॅंकांकडून व्याजदर वाढवले तर ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर बँकांनी व्याज दर 8 टक्के केल्यानंतर ईएमआय 25 हजार 93 रुपये इतका होणार आहे. सरासरी 925 रुपये प्रति महिना वाढ होणार आहे. याचाच अर्थ वर्षाकाठी तुम्हाला 11 हजार 100 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. जर, तुम्ही 20 लाखांचे गृह कर्ज 20 वर्षांसाठी 7.5 टक्के (अंदाजित) दराने घेतले असल्यास याआधी तुम्हाला 16 हजार 112 रुपयांचा ईएमआय भरावा लागत होता. आता, नव्या व्याज दरानंतर तुम्हाला आठ टक्के दराने 16 हजार 829 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. याचाच अर्थ 617 रुपये प्रति महिना वाढ होणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला दरवर्षाला 7404 रुपये अधिक मोजावे लागणार आहे.कर्जाचे हप्ते वाढणार म्हणजे नेमकं काय?सर्वसाधारणपणे, बँकांकडून ईएमआय स्थिर ठेवला जातो. परंतु कर्जाचा कालावधी वाढवला जातो. बहुतेक RLLR कर्जदारांसाठी, RBI रेपो दर वाढीचा अर्थ कर्जाच्या कालावधीत वाढ असा आहे. रेपो दर वाढीचा व्याज दरावर परिणाम होतो. त्यामुळे रेपो दर वाढल्यानंतर तुमचा ईएमआय स्थिर असला तरी त्याच्या हप्त्यांच्या कालावधीमध्ये वाढ होते. थोडक्यात तुम्ही व्याजाची अधिक रक्कम बँकेला देता. MCLR कर्ज घेणाऱ्यांवर काय परिणाम?MCLR लिंक्ड कर्ज घेतलेल्यांवर रेपो दर वाढीचा तात्काळ परिणाम जाणवत नाही. MCLR लिंक्ड कर्जामध्ये व्याजाचा कालावधी निश्चित असतो. यामध्ये 12 महिने अथवा सहा महिन्यानंतर MCLR मध्ये बँकांकडून बदल केला जातो. गृहकर्जाच्या व्याज दरात चढ-उतार होत असतो. त्यामुळे कर्ज, व्याज दराच्या बोझ्यापासून सुटका हवी असल्यास, तुमच्याकडे पैशांची अधिक बचत होत राहिल्यास मूळ कर्जाची रक्कम फेडण्याचा प्रयत्न करावा, असे तज्ज्ञ सुचवतात. 

Google Follow Image

Latest NewsMAHARASHTRA WEATHERMAHARASHTRA WEATHER