Sambhajiraje Chhatrapati : मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेत असं घडलं नसतं: संभाजीराजे छत्रपती 

Abp News | 4 days ago | 22-06-2022 | 01:42 pm

Sambhajiraje Chhatrapati : मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेत असं घडलं नसतं: संभाजीराजे छत्रपती 

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे सत्ता बदलाचे वारे वाहू लागले असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेमध्ये असं घडलं नसतं, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून 35 पेक्षा जास्त शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. पण जर मला उमेदवारी शिवसेनेने दिली असती तर आज शिवसेनेचे अशी अवस्था झाली नसती असे मत छत्रपती संभाजीराजे आणि व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आज विश्रांतवाडीमध्ये पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचं स्वागत केलं. यावेळी ते एबीपी माझाशी बोलत होते.एकनाथ शिंदे यांची खदखद आताची नसून पूर्वीपासूनचअहमदनगरमध्ये बोलतानाही त्यांनी या विषयावर भाष्य केलं होतं. संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे यांची खदखद ही आताची नसून पूर्वीपासूनच होती. त्याचा स्फोट फक्त आज झाला असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. जे चाललंय ते तुम्हीही बघत आहात मीही बघतोय, काय निर्णय येतो बघू. सरकार कुणाचेही असावे पण ते चांगलं चालावं आमचं एवढंच मत आहे, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. अहमदनगरच्या गुंडेगाव येथे प्रवेशद्वाराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, ज्यावेळी मराठा समाजाचे आरक्षण गेलं, त्यावेळी बऱ्याच लोकांना वाटत होतं महाराष्ट्रात दंगल व्हावी, पण मी समाजाचं हित पाहिलं, मी कुणाच्या बरोबर आहे हे न बघता त्या स्टेजवर गेलो समाजाला शांत केलं. मी गडकोट किल्ल्याच्या संवर्धनाचे काम केले. बहुजन समाजाच्या हितासाठी काम केलं. मात्र, जेंव्हा मी महाविकास आघाडी सरकारला सांगितले की, मला पुरस्कृत खासदार करा तेंव्हा तिथे वेगवेगळे पक्ष आले, आघाड्या आल्या पण मी केलेलं काम त्यापुढे शून्य झालं, अशी खदखद संभाजीराजे छत्रपती यांनी बोलून दाखवली. इतर महत्वाच्या बातम्याशिंदेंसोबत शिवसेनेचे नेमके आमदार किती? शिंदे म्हणतात 40 तर कुणी म्हणतंय 33, कुणी म्हणतंय 35... महाराष्ट्रावर वार! एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजप 'ऑपरेशन कमळ' घडवतंय; सामनातून हल्लाबोल महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात; कोण आहेत CR पाटील? 

Google Follow Image