ही विकृती छाटून फेकली पाहिले, उदयनराजे भोसले यांचा हल्लाबोल कुणावर?

Tv 9 | 1 week ago | 24-11-2022 | 10:05 pm

ही विकृती छाटून फेकली पाहिले, उदयनराजे भोसले यांचा हल्लाबोल कुणावर?

मुंबई – पक्ष कुठलाही असला तरी राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी या दोघांना हटविलं पाहिजे, ही माजी भूमिका आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले. विकृती ही छाटून फेकून दिली पाहिजे, या मताचा मी असल्याचंही त्यांनी सांगितलं. दुसऱ्या देशात योद्ध्याचा अपमान झाला तर लोकं पेटून उठतात. कोश्यारी आणि त्रिवेदी यांना काढून टाका, असं मागणी करणार पत्र उदयनराजे भोसले यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना लिहिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उदयनराजे यांनी कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर हल्लाबोल केला.राज्यव्यापी असं काहीतरी केलं पाहिजे. महाराष्ट्र बंद केलं पाहिजे. म्हणजे दंगाधोपा नव्हे. केंद्राला हे कळलं पाहिजे की, महाराष्ट्र हा लेच्यापेच्यांचा प्रदेश नाही. केंद्रानं जे सॅम्पल पाठविलं आहे ते त्यांच्या घरी पाठवा, असा निशाणाही उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना दिला. दुसरीकडं अधिक चांगला वृद्धाश्रम असेल तर तिकडं पाठवा. अन्यथा आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसता येणार नाही.राहुल गांधी यांच्या सावरकर यांच्या वक्तव्यावरून आम्ही महाविकास आघाडीला तडा जाईल, असा इशारा दिला होता. आता मिंधे गटानं भूमिका घ्यावी, असं म्हणत शिंदे गटानं सरकारमधून बाहेर पडा असं म्हटलंय.यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज याचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांचे विचार मोडून-तोडून टाकणाऱ्यांना अधिकार आहे का, असा टोला लगावला. सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले. हिंदुत्वाचे विचार मोडले. तडजोड केली. त्यांनी आम्हाला शिकविण्याचा अधिकार नाही.

Google Follow Image