Shahaji Patil : सगळं ठरलंय! फडणवीस मुख्यमंत्री, शिंदे उपमुख्यमंत्री, तर आम्हाला... शिवसेनेच्या आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

Abp News | 4 days ago | 24-06-2022 | 10:11 am

Shahaji Patil : सगळं ठरलंय! फडणवीस मुख्यमंत्री, शिंदे उपमुख्यमंत्री, तर आम्हाला... शिवसेनेच्या आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

Shahaji Patil : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. जवळपास 7 मंत्र्यांसह 40 आमदारांनी बंड केलं आहे. गटनेतेपदी आपणच आहोत हे सांगण्यासाठी शिंदे गटाकडून प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी सगळं ठरलंय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला सांगितलं. रफीक शेख असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. शहाजी पाटील नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात...काय झाडी, काय डोंगार, सगळं ओकेशहाजी पाटील हे सांगोला तालुक्याचे शिवसेनेचे आमदार आहेत. ते सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहटीमध्ये आहेत. त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये एका कार्यकर्त्याने फोन करुन आपण कुठे असल्याची विचारणा केली. यावेळी शहाजी पाटील म्हणाले की, मी गुवाहटीत आहे. इकडं काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, सगळं ओके आहे. कोणाला फोन करु नका असा नेत्यांचा आदेश होता. त्यामुळं फोन केला नसल्याचं त्यांनी सांगितलं. हा माणूस बोलत नाही पण रिझल्टएकनाथ शिंदे जास्त बोलत नाहीत पण त्यांचे रिझल्ट करेक्ट आहेत. मला हे नेतृत्व खूप आवडलं आहे. आपवी ओळख नाही पाळख नाही तरीपण त्यांनी माझी विचारपूस केल्याचं शहाजी पाटील यांनी सांगितलं. तुम्ही गणपतराव देशमुख यांच्या मतदारसंघातून निवडून आले आहेत, तुम्ही काही पण काम सांगा असे शिंदे म्हणाल्याचे पाटील यांनी सांगितलं.  उद्धव ठाकरे देव माणूसएकही आमदार उद्धव साहेबांच्या विरोधात नाही. त्यांना देव माणूस मानत आहे असेही सांगायला शहाजी पाटील विसरले नाहीत. पुढच्या अडीच वर्षात तालुक्याचा ऐतिहासीक विकास होणार आहे. तुम्ही बघत राहा फक्त. पण हे सांगत असताना गेल्या अडीच वर्षातमध्ये सांगोला उपसा सिंचन योजनेला नाव आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या, अशा मागणीची बारा पत्र दिली असतानाही नाव दिले नसल्याची तीव्र नाराजी शहाजी पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळं एकीकडं उद्धव ठाकरेचं कोडकौतुक सांगोल्याचे आमदार करीत असले तरी दुसरीकडे मात्र त्यांच्या मनात मतदारसंघाच्या निमित्तानं एक प्रकारची नाराजी पक्षनेतृत्वावर दिसून येत आहे.प्रथम शंभूराज देसाई आणि मी दोघेच गेलोसांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आपणास सभागृहात बोलू दिले नाही, याबाबतची नाराजीही शिवसेनेबद्दल यावेळी शहाजी पाटील यांनी व्यक्त केली. आपण योग्य निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटांमध्ये शंभूराज देसाई आणि मी आम्ही दोघे पहिल्यांदा गेलो मग बाकीचे आमदार आले असाही खुलासाही यावेळी पाटील यांनी केला. तसेच तीन दिवस झाले आपण गुवाहाटीमध्ये आहे. त्यामुळं तालुक्यात काय घडते आहे, यासाठी तुम्हाला फोन केला असल्याची कबुलीही यावेळी पाटील यांनी दिली. हे पाटील यांचे कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होत आहे.महत्वाच्या बातम्या:

Google Follow Image