Share Market : शेअर बाजारातील चढ-उतार सुरूच, Nifty 15,500  वर तर  Sensex 488 अंकांनी वधारला

Abp News | 3 days ago | 23-06-2022 | 03:35 pm

Share Market : शेअर बाजारातील चढ-उतार सुरूच, Nifty 15,500  वर तर  Sensex 488 अंकांनी वधारला

मुंबई: शेअर बाजारातील चढ-उतारीचा खेळ सुरूच असून बुधवारच्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा शेअर बाजार वधारला आहे. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्समध्ये 488 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 162 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये आज 0.94 टक्क्याची वाढ होऊन तो 52,311 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 1.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,576 अंकावर पोहोचला. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 150 अंकांनी वधारत 51,972.75 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 38 अंकांची उसळण दिसून आली. निफ्टी 15,451.55 च्या पातळीवर खुला झाला होता. बुधवारी शेअर बाजारात घसरण असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली आहे.आज शेअर बाजार बंद होताना 2037 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1188 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज 123 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. Maruti Suzuki, Hero MotoCorp, Eicher Motors, M&M आणि Bajaj Auto या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तर  Reliance Industries, Coal India, NTPC, Power Grid Corporation आणि Grasim Industries या कंपन्याच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे. ऑटो इंडेक्समध्ये आज चार टक्क्यांची वाढ झाली तर कॅपिटल गुड्स, बँक, आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक टक्क्याची वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया काहीसा वधारलाआज डॉलरच्या तुलनेत रुपया काहीसा वधारला असून रुपयाची आजची किंमत ही 78.31 इतकी आहे. बुधवारी रुपयाची किंमत ही 78.38 इतकी होती. या कंपन्यांचे शेअर्स वधारलेया कंपन्यांचे शेअर्स घसरले

Google Follow Image